नमन्मौलिमंदारमालाभिषिक्तम् |
नमस्यामि शंभो पदांभोरुहं ते
भवांभोधिपोतं भवानी विभाव्यम् ‖ ६ ‖
स्मरणा नंतरची अवस्था असते वंदन. भगवान श्री शंकरांच्या चरणकमलांना प्रेमभराने वंदन करण्यासाठी सिद्ध भगवान जगद्गुरु आचार्यश्री त्या भगवान श्री विश्वनाथांच्या चरणकमलांचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
स्वसेवासमायात- सेवा करण्यासाठी स्वतः एकत्रित आलेल्या,
देवासुरेंद्रा- देवता तथा सुरेंद्र म्हणजे देवराज इंद्र.
नमन्मौलि- त्यांनी नमन् म्हणजे झुकविलेल्या मौली म्हणजे मस्तकांवर,
मंदारमाला- धारण केलेल्या मंदार म्हणजे स्वर्गात असणाऱ्या नंदनवनातील कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळांनी,
अभिषिक्तम् – ज्याच्यावर अभिषेक केला जातो असे.
कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या वंदनासाठी आलेल्या देवतांच्या मस्तकावर असणाऱ्या पुष्पमालांनी त्या चरणांवर पुष्पाभिषेक होतो. ही कल्पना किती सुंदर आहे?
वास्तविक या देवता सगळ्यांसाठी वंदनीय. मात्र भगवान विश्वनाथ या देवतांसाठी देखील वंदनीय. म्हणून तर देवांचे देव महादेव.
नमस्यामि – मी नमस्कार करतो.
शंभो ते – हे भगवान शंकरा आपल्या,
पदांभोरुहं- चरण कमलांना.
कशी आहेत हे भगवान श्री शंकराची चरणकमले? तर आचार्य श्री पुढे म्हणतात,
भवांभोधिपोतं – भव म्हणजे संसार. अंभोधी म्हणजे सागर. तर पोत म्हणजे नौका. अर्थात या संसाररुपी सागरातून तारुन नेणारी नौका असणाऱ्या, संसार मुक्तीचा मार्ग असणाऱ्या,
भवानी विभाव्यम् – भवानी म्हणजे आई जगदंबा पार्वतीने चरणसेवा रुपी सत्कार केलेल्या, त्या श्री चरणांची मी वंदना करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply