स्थित्वा स्थाने सरोजे प्रणवमयमरुत्कुण्डले सूक्ष्ममार्गे
शान्ते स्वान्ते प्रलीने प्रकटितविभवे ज्योतिरूपे पराख्ये ।
लिड्गज्ञे ब्रह्मवाक्ये सकलतनुगतं शड्करं न स्मरामि
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१०॥
येथे भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज ध्यान मार्गाच्या अंतिम अवस्थेचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
स्थित्वा स्थाने सरोजे – ब्रह्मरंध्रामध्ये असणाऱ्या सहस्त्रदल कमला मध्ये स्थिर होऊन,
प्रणवमय – ओंकार ब्रह्मस्वरूप भगवान शंकरांचे ,
मरुत्कुण्डले – जेथे प्राणवायु प्राणशक्ती मध्ये विलीन होतो त्या कुंडामध्ये,
सूक्ष्ममार्गे- कुंडलिनीच्या सूक्ष्म मार्गाने प्रवास करून, तेथे निवास करणाऱ्या,
शान्ते – काहीही मिळवायचे नसल्याने परमशांत असलेले,
स्वान्ते- स्वतःच्याच स्वरूपात असणारे,
प्रलीने- आत्मरूपात लीन असणारे,
प्रकटितविभवे – बाहेर आपल्या संपूर्ण वैभवाला प्रकट करणारे,
ज्योतिरूपे – चैतन्यस्वरूप तेजस्वी,
पराख्ये- परमतत्व असणारे,
लिड्गज्ञे – शिवलिंगाच्या माध्यमातून ज्यांचे ज्ञान घडते असे,
ब्रह्मवाक्ये – उपनिषदातील महा वाक्यांमध्ये ज्यांचे तत्त्ववर्णन केले आहे असे,
सकलतनुगतं- सर्व ईश्वर महेश्वर यांच्याद्वारे सेवा केली जात असणारी,
शड्करं न स्मरामि – असे जे भगवान शंकर आहेत त्यांचे मी कधीही स्मरण देखील केले नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो – हे भगवान महादेव शंभू शंकरा ! माझ्या या अपराधाकरिता मला क्षमा करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply