करचरणकृतं वाककायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् ।
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ॥१६॥
स्तोत्राच्या शेवटी मी जे काही करतो, अर्थात या देह मन बुद्धी च्या द्वारे जे जे काही घडते, त्या सगळ्यांच्या मध्ये माझ्या अज्ञानामुळे ज्या ज्या चुका होतात, त्या सगळ्यां करिता आचार्यश्री एकत्र क्षमायाचना करीत आहेत. ते म्हणतात,
करचरणकृतं – हात किंवा पाय अर्थात कर्मेंद्रिये यांच्याद्वारे मी जे काही केले,
वाक – वाणीच्या द्वारे मी जे काही बोललो, विचार व्यक्त केले.
कायजं – शरीराच्या द्वारे अगदी सहज घडणारी क्रिया पापणी लवविण्यापासून मुद्दाम ठरवून केलेल्या प्रत्येक क्रियेपर्यंत जे काही केले.
कर्मजं वा – माझी जी काही ही शारीरिक मानसिक बौद्धिक कर्म होती.
श्रवणनयनजं वा – कानांनी ऐकणे किंवा डोळ्यांनी पाहणे या द्वारी देखील जिकली केले.
मानसं वापराधम् – किंवा मानसिक स्वरूपात जे अपराध केले.
ते केवळ मनाच्या पातळीवर असल्याने इतर कोणाला दिसले नसली तरी हे अंतर्यामी परमेश्वरा तुला अगम्य काय आहे?
विहितमविहितं वा- मी जी काही शास्त्र विहित किंवा अविहित कर्मे केली.
या सगळ्यांच्या मध्ये माझ्याद्वारे ज्या काही चुका झाल्या आहेत. अपराध घडलेले आहेत,
सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो – हे करुणासागर भगवान महादेव शंकरा ! मी आपला जयजयकार करतो. या सर्व गोष्टींसाठी मला क्षमा करा.
अशा रीतीने आचार्यश्री विविध कारणांकरिता भगवान श्री शंकरांच्या चरणी क्षमायाचना करीत असल्याने या स्तोत्राला श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् असे संबोधिले जाते.
ॐ नमः शिवाय !
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply