पुरम्दरपुरंध्रिकां चिकुरबंधसैरंध्रिकां ,
पितामहपतिव्रतां पटुपटीरचर्चारताम् |
मुकुंदरमणीं मणिलसदलंक्रियाकारिणीं,
भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् ॥८॥
पृथ्वीवर जेव्हा एखादी स्त्री सम्राज्ञी पदावर आरूढ होते त्यावेळी इतर मांडलिक राजांच्या राण्या तिची दासी स्वरूपात सेवा करतात.
आई जगदंबा त्रिपुरसुंदरी या अनंतकोटी ब्रह्मांडांची सम्राज्ञी असल्याने तिच्या सेवेला उपस्थित असणाऱ्या अलौकिक दैवी शक्तींचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
पुरंदरपुरंध्रिकां चिकुरबंधसैरंध्रिकां – पुरंदर अर्थात देवराज इंद्र. भगवान ब्रह्मदेवांच्या एका दिवसात चवदा इंद्र होतात असे वर्णन आहे. सध्या असणाऱ्या इंद्राचे नाव पुरंदर आहे. त्यांची पुरंध्रिका म्हणजे स्त्री. ती देवी शची, आई जगदंबेची, चिकुरबंधसैरंध्रिका म्हणजे वेणी घालणारी दासी असते.
पितामहपतिव्रतां पटुपटीरचर्चारताम् – पितामह अर्थात भगवान ब्रह्मदेव. त्यांची पतीव्रता म्हणजे देवी सावित्री, सरस्वती. आई जगदंबेचा सोबत चर्चा करून अर्थात तिला गोष्टी सांगून तिचे मनोरंजन करते.
मुकुंदरमणीं मणिलसदलंक्रियाकारिणीं- मुकुंद अर्थात भगवान श्री विष्णू. त्यांची रमणी म्हणजे देवी लक्ष्मी. ती आई त्रिपुरसुंदरी ला विविध अलंकारांनी नटवत असते.
भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् – सुर वधू अर्थात देवतांच्या स्त्रिया.टिका शब्दाचा एक अर्थ आहे श्रेष्ठ. त्या श्रेष्ठ देवस्त्रिया आई जगदंबेच्या चेटी म्हणजे दासी असतात.
अशा अद्वितीय भुवन अंबिकेची मी आराधना करतो.
जय श्रीत्रिपुरसुंदरी.!
जय जगदंब !!
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply