स्तोत्रं त्रिसन्ध्यं शिवपार्वतीभ्यां
भक्त्या पठेद्द्वादशकं नरो यः |
स सर्वसौभाग्यफलानि
भुङ्क्ते शतायुरान्ते शिवलोकमेति ‖ १३ ‖
भगवान श्री उमामहेश्वरांच्या या दिव्य स्तुतीची समापना करताना आचार्य श्री फलश्रुती स्वरूपात म्हणतात,
स्तोत्रं त्रिसन्ध्यं शिवपार्वतीभ्यां
भगवान शंकर आणि पार्वती चे हे स्तोत्र तीनही संध्यासमयी म्हणावे.
रात्र आणि दिवस यांची संध्या म्हणजे जोड असणारा सूर्योदय. दिवसाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा जोड असणारा मध्याह्न तर दिवस आणि रात्र यांचा जोड असणारी संध्याकाळ, सूर्यास्त. या तीनही समयांना भारतीय संस्कृतीत संध्या काळ असेच म्हटले आहे. या तीनही काळावर केल्या जाणाऱ्या प्रार्थनेला संध्या असेच म्हणतात.
यातील काळांचे वर्णन एका वेगळ्या अर्थाने समजून घ्यावे लागेल. यातील जागी
या तीनही काळी या स्तोत्राचे पठन करावे असे आचार्य सांगत आहेत.
भक्त्या – हे पठन केवळ शब्दोच्चार स्वरूपातील नसावे तर त्यामध्ये भक्तीपूर्ण अंत:करणाचा विचार आचार्य श्री प्रधान रुपात सांगत आहेत.
पठेद्द्वादशकं नरो यः – जो माणूस हे द्वादशक म्हणजे बारा श्लोकांचे स्तोत्र म्हणतो,
स सर्वसौभाग्यफलानि
भुङ्क्ते – त्याला सर्व सौभाग्य फल प्राप्त होतात.
जे जे काही मनात असेल ते सर्व प्राप्त होते. अनपेक्षित लाभ देखील मिळतात.
शतायुरान्ते – शंभर वर्षाच्या आयुष्याच्या शेवटी, लक्षार्थाने दीर्घायुष्या नंतर, तो साधक,
शिवलोकमेति – शिवलोकाला जातो. अर्थात भगवान शंकरांच्या सन्मुख जाऊन त्या स्वरूपात विलीन होतो.
ॐ नमः शिवाय !
–प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply