नमः शिवाभ्यां कलिनाशनाभ्यां
कङ्कालकल्याणवपुर्धराभ्यां |
कैलासशैलस्थितदेवताभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ ७ ‖
भगवान शंकर आणि देवी पार्वती युगुलस्वरूपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात,
नमः शिवाभ्यां – भगवान शंकरांनी देवी पार्वती दोघांनाही वंदन असो.
कलिनाशनाभ्यां – हे दोघेही कलीचा विनाश करणारे आहेत.
येथे कली शब्द केवळ एका युगाचा वाचक नसून ह्या कलियुगामध्ये होणाऱ्या विविध वाईट गोष्टींचा प्रतीक आहे.
कली म्हणजे पाप .कली म्हणजे दोष. कली म्हणजे अन्याय. कली म्हणजे अत्याचार, कली म्हणजे दुराचार.
मानवी मनामध्ये निर्माण होणाऱ्या या सर्व विकृतींचा विनाश भगवंताच्या चरणाशी होत असल्याने श्री शिव-पार्वती ला कलिनाशक असे म्हटले आहे.
कङ्कालकल्याणवपुर्धराभ्यां |
भगवान शंकर आणि पार्वती या दोघांच्या अनेक गोष्टी परस्परांशी पूर्ण विपरीत आहेत.
भगवान शंकर गळ्यात कंकाल म्हणजे नरमुंडांची माळ घालतात. तर आई जगदंबा गळ्यात कल्याण म्हणजे कल्पवृक्षाच्या फुलांची माळ धारण करते.
या दोन्ही गोष्टींनी त्यांचे शरीर सुंदर दिसत आहे.
कैलासशैलस्थितदेवताभ्यां
हे दोघेही कैलास पर्वताच्या शिखरावर निवास करीत असतात.
शिखर हे पर्वताचे सर्वोच्च स्थान असते. सगळ्यात वर तोच असतो जो सर्वश्रेष्ठ असतो.
अन्य सर्व देवी देवतांपेक्षा भगवान श्री शंकर महादेव असल्याने सर्वश्रेष्ठ आहेत, हे सांगण्यासाठी त्यांचे निवासस्थान कैलास शैला वर सांगितलेले आहे.
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – अशा या भगवान शंकरांनी पार्वतीला वंदन असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply