श्री गणेश अवतार लीला २ – श्री विनायक अवतार
कृतयुगामध्ये रुद्र केतू आणि शारदा या दांपत्याच्या पोटी देवांतक आणि नरांतक नावाची जुळी मुले जन्माला आली.
भगवान शंकरांच्या दिव्य तपाने अलौकिक वरदान मागितलेल्या या दोघांच्या त्रासापुढे हतबल झालेल्या देवतांनी प्रार्थना केल्यामुळे भगवान श्री गणेशांनी देवी आदिती आणि महर्षीकश्यप यांच्या आश्रमामध्ये घेतलेला अवतार म्हणजे श्री विनायक अवतार.
या दोन्ही राक्षसांच्या सामर्थ्यामुळे पराजित झालेले देव वनवासी जीवन जगू लागले. या संकटातून वाचविण्यासाठी भगवान गणेशाची आराधना करू लागले.
तिकडे देवी अदिती आपल्या मुलांची ही दशा पाहून दुःखी झाली आणि भगवान कश्यपांना शरण गेली. त्यांनी तिलाही गणेश आराधनेचा मार्ग सांगितला.
तिच्या तपाच्या परिणाम रूपात माघ शुद्ध चतुर्थीला भगवान गणेश विनायक रूपात प्रकट झाले.
गंधर्वांच्या समोर केली पंचायतन लीला,काशीराजाच्या कडे केलेल्या विविध लीला, भगवान भृशुंडींचे दिव्य आख्यान, स्त्री सैन्याचा प्रथम आविष्कार आणि शेवटी नरांतक देवांतक वध अशा या अवतारातील विविध महत्त्वपूर्ण लीला श्री गणेश पुराण तथा मुद्गल पुराणात वर्णिल्या आहेत.
एकाच गणेशांच्या वर्षभरात दोन जयंत्या कशा? असा प्रश्न पडणार यांसाठी विशेष विजन की काल सांगितला तो मयूरेश्वर अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा. तर हा विनायक अवतार माघ शुद्ध चतुर्थी चा.
या दोन अवतारांच्या या वेगवेगळ्या जन्मतिथींचा विचार शास्त्रात आला आहे.
भाद्रपद चतुर्थी चा अवतार शिवपार्वती यांच्या घरी झाला असल्याने त्या चतुर्थीला स्वर्गाची चतुर्थी तर विनायक अवतार महर्षी कश्यपने आणि अदितीच्या घरी झाला असल्याने या चतुर्थीला पृथ्वीवरची चतुर्थी म्हणतात.
अशा या विनायक अवताराची जन्मतिथी आहे माघ शुद्ध चतुर्थी.
जय श्रीविनायक
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply