स्वभक्तॆषु सन्दर्शिताकारमॆवम्
सदा भावयन् सन्निरुद्धॆन्द्रियाश्वः ।
दुरापं नरॊ याति संसारपारम्
परस्मै परेभ्यॊऽपि तस्मै नमस्तॆ ॥ ८ ॥
भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सांगत असताना प्रस्तुत श्लोकामध्ये आचार्य श्री म्हणतात,
स्वभक्तॆषु सन्दर्शिताकारमॆवम्
सदा भावयन् सन्निरुद्धॆन्द्रियाश्वः ।
या दोन्हीचा एकत्र विचार केला तरच संपूर्ण अर्थ लक्षात येऊ शकतो.
इंद्रिय अश्व म्हणजे इंद्रिय रूपी घोड्यांना. संनिरूद्ध म्हणजे अडवून. जे भक्त भगवंताचे ध्यान करतात त्यांना स्वतःच्या स्वरूपाच्या दर्शनाने भगवान सदैव प्रसन्न करतात.
यात इंद्रियांना घोडे असे म्हटले आहे. हे उपनिषदाने वापरलेले रूपक आहे.
घोडे जसे अत्यंत बलवान असतात तसेच इंद्रिये देखील अत्यंत बलवान आहेत. घोडे जिकडे धावत जातील तिकडे रथ आपोआपच ओढला जातो. त्याप्रमाणे प्रथम इंद्रिय आपल्या विषयाकडे जाते आणि त्यानंतर देह तिकडे फरफटत नेला जातो. या व्यावहारिक सत्याचे हे वर्णन आहे.
अशा स्वतःच्या इंद्रियांना जो आपल्या ताब्यात ठेवतो त्याचाच रथ अर्थात जीवन गंतव्य स्थानी पोहोचू शकते.
असा जितेंद्रिय ज्या वेळी मनात भगवंताचे स्मरण करतो त्यावेळी भगवान त्याला सदैव दर्शन देऊन प्रसन्न करतात. असे आचार्यश्री सांगत आहेत.
दुरापं नरॊ याति संसारपारम् –
तरून जाण्यासाठी अत्यंत दुस्तर असणाऱ्या या संसारातून भगवानच त्याला पार नेतात.
इतर वेळी भगवंताच्या कृपेशिवाय हा संसार पार करणे असंभव आहे. त्यामुळे त्याला दूराप असे म्हटले आहे. मात्र भगवान आपल्या भक्तांना यातून सहजतेने पार नेतात.
परस्मै परेभ्यॊऽपि – अशा त्या सगळ्या पर म्हणजे श्रेष्ठां मध्येही श्रेष्ठ असणाऱ्या
तस्मै नमस्तॆ – भगवान श्रीहरींना मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply