रेखाः लेखाभिवन्द्याश्चरणतलगताश्चक्रमत्स्यादिरूपाः
स्निग्धाः सूक्ष्माः सुजाता मृदुललिततरक्षौमसूत्रायमाणाः ।
दद्युर्नो मंगलानि भ्रमरभरजुषा कोमलेनाब्धिजायाः
कम्रेणाम्रेड्यमाना किसलयमृदुना पाणिना चक्रपाणेः ॥११॥
भगवान श्रीविष्णूच्या चरणकमलावर असणाऱ्या विविध मंगल चिन्हांचे वर्णन शास्त्र ग्रंथांमध्ये केलेली आहे.
अशा चिन्हांनी युक्त असणाऱ्या श्री चरणांचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री करीत आहेत. ते म्हणतात,
रेखाः लेखाभिवन्द्याश्चरणतलगताश्चक्रमत्स्यादिरूपाः – या चरणात तलावर अर्थात तळपायावर असलेल्या चक्र मत्स्य इत्यादी स्वरूपातील आकृती दाखवणाऱ्या रेषा सगळ्यांना अत्यंत वंदनीय आहेत.
स्निग्धाः – त्या अत्यंत सुकुमार ओलसर आहेत.
सूक्ष्माः – अतिशय नाजूक आहेत.
सुजाता – अत्यंत रेखीव स्वरूपात साकार झालेल्या आहेत. मृदुललिततरक्षौमसूत्रायमाणाः – अत्यंत नाजुक अशा प्रकारच्या रेशमी धाग्यां प्रमाणे आहेत.
दद्युर्नो मंगलानि भ्रमरभरजुषा – ज्यांना कमळ समजून त्या चरणकमलावर भुंगे रुंजी घालत आहेत, ती चरणकमल आम्हाला मंगल प्रदान करोत.
त्यांचे वैशिष्ट्य सांगताना आचार्यश्री पुढे म्हणतात,
कोमलेनाब्धिजायाः – अब्धी म्हणजे समुद्र. त्यातून जन्माला आली ती म्हणजे देवी लक्ष्मी. कम्रेणाम्रेड्यमाना किसलयमृदुना पाणिना चक्रपाणेः – ती आपल्या कोमल, फुलांच्या पाकळी प्रमाणे नाजूक असणाऱ्या हाताने, अत्यंत आनंदाने ज्या चरणांची सेवा करीत आहे. ती भगवान चक्रपाणिंची चरण कमले, आमचे मंगल करोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply