आक्रामद्भ्यां त्रिलोकीमसुरसुरपती तत्क्षणादेव नीतौ
याभ्यां वैरोचनीन्द्रौ युगपदपि विपत्संपदोरेकधाम ।
ताभ्यां ताम्रोदराभ्यां मुहुरहमजितस्याञ्चिताभ्यामुभाभ्यां
प्राज्यैश्वर्यप्रदाभ्यां प्रणतिमुपगतः पादपंकेरुहाभ्याम् ॥१३॥
भगवान श्रीविष्णुंच्या चरणकमलांचे अलौकिकत्व वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
भगवान श्रीविष्णु जगत पालक असल्याने त्यांना देव आणि दैत्य दोन्ही आपले आहेत. कोणत्याही एका समूहावर ते कधीच अन्याय होऊ देत नाहीत. त्यांच्या प्रत्येक लीलेतून ते सगळ्यांचेच कसे कल्याण करतात, ते बलीचा कथेतूनच कसे सिद्ध होते ते आचार्य आपल्यासमोर स्पष्ट करतात.
राजा बलि च्या नियमनासाठी वाढवलेल्या आणि पृथ्वीला व्यापणाऱ्या दोन पावलांच्या द्वारे त्यांनी देवराज इंद्र आणि राक्षस राज बली या दोघांचेही कल्याण केले आहे.
आक्रामद्भ्यां त्रिलोकीमसुरसुरपती तत्क्षणादेव नीतौ – त्रैलोक्याला गवसणी घालणाऱ्या त्या चरणकमलांनी सुरपती आणि असुरपती या दोघांनाही न्याय प्रदान केला.
याभ्यां वैरोचनीन्द्रौ युगपदपि विपत्संपदोरेकधाम – ज्यांनी विरोचन पुत्र बळीला आणि देवराज इंद्र यांना एकाच वेळी स्वर्ग आणि संपत्ती प्रदान केली.
ताभ्यां ताम्रोदराभ्यां मुहुरहमजितस्याञ्चिताभ्यामुभाभ्यां – त्यांचा आतला भाग अत्यंत लालबुंद आहे अशा, भक्त जी इच्छा धारण करतात ती क्षणात पूर्ण करणाऱ्या, त्या भगवान अजित म्हणजे ज्यांना कोणीही कधीच जिंकू शकत नाही अशा भगवान श्री विष्णूंच्या,
प्राज्यैश्वर्यप्रदाभ्यां प्रणतिमुपगतः पादपंकेरुहाभ्याम् – अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या, चरणी शरण आलेल्या भक्तांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या, श्रीविष्णूचा चरणकमलांना मी वारंवार वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply