यभ्यो वर्णश्चतुर्थश्चरमत उदभूदादिसर्गे प्रजानां
साहस्री चापि संख्या प्रकटमभिहिता सर्ववेदेषु येषाम् ।
व्याप्ता विश्वंभरा यैरतिवितततनोः विश्वमूर्तेर्विराजो
विष्णोस्तेभ्यो महद्भ्यः सततमपि नमोस्त्वंघ्रिपंकेरुहेभ्यः ॥१४॥
त्या चरणकमलांच्या अत्यंत व्यापक विशाल स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री सादर करतात. ते म्हणतात,
यभ्यो वर्णश्चतुर्थश्चरमत उदभूदादिसर्गे प्रजानां – या चरणकमलांना पासून विश्वाच्या निर्मितीचा आरंभी प्राणिमात्रांच्या, जीवांच्या निर्मितीच्या वेळी, चार प्रकारच्या वर्णांची निर्मिती करण्यात आली आहे.
येथे मानवातील चार वर्ण हा एक अर्थ आहे तर त्याच प्रमाणे जरायुज, अंडज स्वेदज आणि उद्भिज अशा चार प्रकारच्या जीवांची निर्मिती हा अर्थ देखील अपेक्षित आहे.
साहस्री चापि संख्या प्रकटमभिहिता सर्ववेदेषु येषाम् – सर्व काही जाणणाऱ्या वेदांमध्ये त्यांचा महिमा प्रगट करताना त्यांची संख्या हजारच्या स्वरूपात सांगितली आहे.
सहस्रशीर्षा पुरुष: असा आरंभ असणाऱ्या पुरुषसूक्ता मध्ये वर्णन केलेल्या हजार डोके, हजार हात, हजार पाय या वर्णनाचा हा उल्लेख आहे.
करणारे आणि अशा स्वरूपात हजारो चरण असल्याने प्रत्येकाला वंदना चे स्थान उपलब्ध आहे.
व्याप्ता विश्वंभरा यैरतिवितततनोः विश्वमूर्तेर्विराजो – विश्वाला व्यापणारे अत्यंत विशाल असणारे,
विष्णोस्तेभ्यो महद्भ्यः सततमपि नमोस्त्वंघ्रिपंकेरुहेभ्यः – श्रीविष्णूचा त्या महान चरणकमलांना वारंवार वंदन असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply