यस्यां दृष्ट्वामलायां प्रतिकृतिममराः स्वां भवन्त्यानमन्तः
सेन्द्राः सान्द्रीकृतेर्ष्यास्त्वपरसुरकुलाशंकयाऽऽतंकवन्तः ।
सा सद्यः सातिरेकां सकलसुखकरीं संपदं साधयेन्नः
चञ्चच्चार्वंशुचक्रा चरणनलिनयोश्चक्रपाणेर्नखाली ॥१६॥
भगवान श्रीविष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करताना, त्यातही त्या चरणांगुलींना असणाऱ्या नयनमनोहर नखांचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा एखाद्या महाकवीला लाजवेल असे अलौकिक वर्णन करीत आहे.
त्यां नखांमुळे देवता वर्गाच्या होणारा गोंधळ वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
यस्यां दृष्ट्वामलायां प्रतिकृतिममराः स्वां भवन्त्यानमन्तः
सेन्द्राः सान्द्रीकृतेर्ष्यास्त्वपरसुरकुलाशंकयाऽऽतंकवन्तः ।
त्या अत्यंत अमल म्हणजे स्वच्छ अशा नखांमध्ये चरणावर वंदन करायला आलेल्या देवतांची प्रतिबिंबे उमटतात.
या प्रतिबिंबांच्यामुळे आपल्या पूर्वीच दुसऱ्याच देवता येथे येऊन पोहोचलेल्या आहेत की काय? या कल्पनेने देवता गोंधळून जातात.
ही लोकविलक्षण कल्पना थोडी समजून घ्यायला हवी. भगवंताला आपण अनंत कोटी ब्रह्मांडनायक असे म्हणतो. या प्रत्येक ब्रह्मांडात त्या त्या ब्रह्मांडाच्या देवता आहेत. भगवंताच्या चरणाला वंदन करण्यासाठी आलेल्या देवतांना आपली प्रतिबिंबे दिसतात त्यावेळी त्यांना त्या दुसर्या ब्रह्मांडातील देवता आल्या की काय अशी शंका येते. असे अफाट वर्णन आचार्य श्री करीत आहेत.
सा सद्यः सातिरेकां सकलसुखकरीं संपदं साधयेन्नः – ज्यांना शरण आलेल्या आम्हाला काळ सर्व प्रकारच्या सुखदायी संपदा प्राप्त होतात.
चञ्चच्चार्वंशुचक्रा चरणनलिनयोश्चक्रपाणेर्नखाली – ज्यांच्या हालचालीमुळे त्या नखां परिवर्तित होणाऱ्या प्रकाशाचा खेळ सुरू असणारी ती नखे आमचे कल्याण करोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply