पादांभोजन्मसेवासमवनतसुरव्रातभास्वत्किरीट-
प्रत्युप्तोच्चावचाश्मप्रवरकरगणैश्चित्रितं यद्विभाति ।
नम्रांगानां हरेर्नो हरिदुपलमहाकूर्मसौन्दर्यहारि-
च्छायं श्रेयःप्रदायि प्रपदयुगमिदं प्रापयेत्पापमन्तम् ॥१७॥
भगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय चरणतलाचे, चरणांगुलींचे मनोहारी वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणांच्या वरच्या भागाचे वर्णन करीत आहेत. बोटां पासून घोट्यापर्यंत मध्ये जो उंचवटा आहे त्याचे वर्णन त्यांनी प्रस्तुत श्लोकात केलेले आहे.
आचार्य श्री म्हणतात,
पादांभोजन्मसेवा – चरण रुपी अभोजन्म म्हणजे कमळांची सेवा करण्यासाठी, त्यावर वंदन करण्यासाठी,
समवनतसुरव्रात – जेव्हा सगळ्या देवतांचा समुदाय, त्यावर वाकतो. नमस्कारासाठी खाली झुकतो,
भास्वत्किरीट- तेव्हा त्यांच्या मस्तकावरील तेजस्वी मुकुटात मध्ये असणाऱ्या,
प्रत्युप्तोच्चावचाश्म – सर्वत्र प्रकाश पसरवणाऱ्या रत्नांच्या द्वारे
प्रवरकरगणैश्चित्रितं यद्विभाति – त्या रत्नातून विकीर्ण होणारी प्रभा पसरल्यामुळे जे अधिकच सुंदर दिसत आहे.
नम्रांगानां हरेर्नो – त्या सगळ्यांनी वंदन केलेल्या भगवान श्रीहरीच्या हरिदुपलमहाकूर्मसौन्दर्यहारि- पाचूनी मढवलेल्या मोठ्या कूर्माचे सौंदर्य धारण करणारे.
भगवंताचा पाय मध्यभागी उंचवटा असलेला आहे. त्यावर देवतांच्या मस्तकावरील मुकुटातील रत्नांचे तेज पसरले असल्याने त्याच्या ठिपक्या मुळे जणू काही तो उंचवटा एखाद्या कासवाच्या पाठीप्रमाणे शोभून दिसत आहे.
च्छायं श्रेयःप्रदायि प्रपदयुगमिदं प्रापयेत्पापमन्तम् – सर्व पापांचे निवारण करणारी ती चरण युगुले आम्हाला सर्व श्रेयस्कर गोष्टींचे प्रदान करणारी ठरोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply