श्रीमत्यौ चारुवृत्ते करपरिमलनानन्दहृष्टे रमायाः
सौन्दर्याढ्येन्द्रनीलोपलरचितमहादण्डयोः कान्तिचोरे ।
सूरीन्द्रैः स्तूयमाने सुरकुलसुखदे सूदितारातिसंघे
जंघे नारायणीये मुहुरपि जयतामस्मदंहो हरन्त्यौ ।१८॥
भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे वर्णन केल्यानंतर आता थोडे वर सरकत आचार्य श्री भगवंताच्या पिंढऱ्यांचे म्हणजे घोट्यापासून गुडघ्यापर्यंतच्या भागाचे वर्णन करीत आहे. या भागाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देवी लक्ष्मी सतत या भागाला आपल्या हस्त कमलाने हळूवार चुरत असते. त्यामुळे त्यापासूनच आरंभ होतो. आचार्य श्री म्हणतात,
श्रीमत्यौ – देवी लक्ष्मीने युक्त असणाऱ्या,
चारुवृत्ते – सुंदर वर्तुळाकृती आकार असणाऱ्या,
करपरिमलनानन्दहृष्टे रमायाः – देवी लक्ष्मी ने आपल्या हाताने सेवा केल्यामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने ज्यांच्यावर रोमांच उभे राहिले आहेत अशा,
सौन्दर्याढ्येन्द्रनीलोपलरचितमहादण्डयोः कान्तिचोरे – आपल्या सौंदर्याच्या द्वारे इंद्रनील मण्यापासून निर्माण केलेल्या एखाद्या स्तंभाचे सौंदर्य हरण करणारे, अर्थात तशा स्वरूपातील अत्यंत आकर्षक असणाऱ्या,
सूरीन्द्रैः स्तूयमाने – सर्व देवतांना सह देवराज इंद्राने त्याची स्तुती केली आहे अशा,
सुरकुलसुखदे – सर्व देवता रुपी समूहाला आनंद देणाऱ्या,
सूदितारातिसंघे – सर्व दैत्यांचा सहज विनाश करणाऱ्या,
जंघे नारायणीये मुहुरपि जयतामस्मदंहो हरन्त्यौ – आमच्या अहंकारादि समस्त पापांना दूर करणाऱ्या भगवान श्री नारायण यांच्या पिंढऱ्यांना वारंवार वंदन असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply