सम्यक् साह्यं विधातुं सममपि सततं जंघयोः खिन्नयोर्ये
भारीभूतोरुदण्डद्वयभरणकृतोत्तंभभावं भजेते ।
चित्तादर्शं निधातुं महितमिव सतां ते समुद्गायमाने
वृत्ताकारे विधत्तां हृदि मुदमजितस्यानिशं जानुनी नः ॥१९॥
भगवान श्रीवैकुंठनाथ श्रीहरीच्या विविध अवयवांचे अलौकिक वैभव वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज या श्लोकांमध्ये भगवंताच्या गुडघ्यांचे वर्णन करीत आहेत.
शरीर रचनेमध्ये गुडघ्यांचे असणारे अत्यंत महत्त्वाचे स्थान लक्षात घेत आरंभी ते म्हणतात,
सम्यक् साह्यं विधातुं सममपि सततं जंघयोः खिन्नयोर्ये – भगवान श्री विष्णूचे हे दोन्ही गुडघे सातत्याने त्यांच्या शरीराचा भार उचलून थकून गेलेल्या पिंढऱ्यांना सतत साह्य करतात.
अर्थात भगवंताच्या विशाल देहाचा भार स्वतः पेलवत पायाला त्या कार्यात सहकार्य करतात.
भारीभूतोरुदण्डद्वयभरणकृतोत्तंभभावं भजेते – त्याचप्रमाणे अत्यंत मजबूत असल्यामुळे भारदस्तपणा ने जडावलेल्या दोन्ही मांड्यांना उचलण्याची शक्ती या पिढऱ्यांना प्रदान करतात.
चित्तादर्शं निधातुं महितमिव सतां ते समुद्गायमाने – सतत भक्तीने भगवंताचे महिमान अंगात असलेल्या भक्तांच्या चित्तांना ठेवण्याची ती सगळ्यात सुरक्षित जागा आहे.
भगवंताच्या गुडघ्यातील गोल पोकळी म्हणजे जणू भक्ताच्या चित्ताला सांभाळणारी सुरक्षित पेटी आहे अशी अद्भुतरम्य कल्पना आचार्य येथे करीत आहेत.
वृत्ताकारे विधत्तां हृदि मुदमजितस्यानिशं जानुनी नः – अत्यंत सुबक वर्तुळाकार असणाऱ्या त्या गुड यांनी आम्हाला नेहमी आनंद प्रदान करावा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply