देवो भीतिं विधातुः सपदि विदधतौ कैटभाख्यं मधुं चा-
प्यारोप्यारूढगर्वावधिजलधि ययोरादिदैत्यौ जघान ।
वृत्तावन्योन्यतुल्यौ चतुरमुपचयं बिभ्रतावभ्रनीला-
वूरू चारू हरेस्तौ मुदमतिशयिनीं मानसे नो विधत्ताम् ॥२०॥
प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्री विष्णूच्या मांड्यांचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी एका पौराणिक कथेचा आधार घेतला आहे.
विश्वाच्या आरंभी जेव्हा सर्वत्र केवळ जल पसरलेले होते, फक्त भगवान ब्रह्मदेव प्रगट होऊन आपले कार्य करीत होते, त्यावेळी योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूच्या कानातून निघालेल्या मळाच्या थेंबापासून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आले.
त्यांनी भगवान ब्रह्मदेवांवर आक्रमण केल्यावर त्यांनी योगनिद्रेची प्रार्थना केल्यामुळे तिचा प्रभाव दूर झालेल्या श्री विष्णूंनी या दोन्ही राक्षसांचा वध केला. तो कथाभाग आधाराला घेऊन आचार्य श्री म्हणतात,
देवो भीतिं विधातुः सपदि विदधतौ कैटभाख्यं मधुं चा-
प्यारोप्यारूढगर्वावधिजलधि ययोरादिदैत्यौ जघान – ज्यांनी सर्वत्र जल असताना आपल्या मांडीवर घेऊन मधु आणि कैटभ या नावाचा राक्षसांचा गर्व आणि भगवान ब्रह्मदेवांच्या मनातील भीती ,राक्षसांना मारून नष्ट केली.
वृत्तावन्योन्यतुल्यौ – अशा त्या अत्यंत गोलाकार असणाऱ्या आणि एकमेकींना समान असणाऱ्या
चतुरमुपचयं – सुंदर आकार असणाऱ्या
बिभ्रतावभ्रनीला – मेघाचा निळा रंग धारण करणाऱ्या
वूरू चारू हरेस्तौ मुदमतिशयिनीं मानसे नो विधत्ताम् – वान श्रीविष्णूच्या अत्यंत आनंद देणाऱ्या मांड्या आम्ही मनात धारण करतो. त्यांचे चिंतन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply