पीतेन द्योतते यच्चतुरपरिहितेनांबरेणात्युदारं
जातालंकारयोगं जलमिव जलधेः बाडवाग्निप्रभाभिः ।
एतत्पातित्यदान्नो जघनमतिघनादेनसो माननीयं
सातत्येनेव चेतोविषयमवतरत्पातु पीतांबरस्य ॥२१॥
भगवंताच्या मांड्यांच्या वर गेल्यानंतर कमरेपाशी भगवंताने धारण केलेल्या पीतांबरा चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री करीत आहेत.
भगवान आपल्या घननील शरीरावर पीतांबर धारण करतात. त्या काळ्या निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या संगतीने जे सौंदर्य निर्माण होते त्याचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा एखाद्या महाकवीला लाजवेल अशा स्वरूपात प्रगट होते. ते शब्दकळा योजितात,
पीतेन द्योतते यच्चतुरपरिहितेनांबरेणात्युदारं
जातालंकारयोगं जलमिव जलधेः बाडवाग्निप्रभाभिः – भगवान श्रीविष्णूंनी चतुर पद्धतीने परिधान केलेल्या अत्यंत सुंदर अशा पितांबराच्या मुळे त्यांची कंबर म्हणजे जणूकाही निळ्या सागरात उठलेल्या वडवाग्निच्या ज्वालांचे सौंदर्य धारण करते.
भगवंताच्या शरीराला समुद्राची आणि पितांबराला वडवानलाच्या ज्वालांची उपमा नितांत रमणीय आहे.
एतत्पातित्यदान्नो जघनमतिघनादेनसो माननीयं
सातत्येनेव चेतोविषयमवतरत्पातु पीतांबरस्य ॥२१॥
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply