उन्नम्रं कम्रमुच्चैरुपचितमुदभूद्यत्रपत्रैर्विचित्रैः
पूर्वं गीर्वाणपूज्यं कमलजमधुपस्यास्पदं तत्पयोजम् ।
तस्मिन्नीलाश्मनीलैस्तरलरुचिजलैः पूरिते केलिबुद्ध्या
नालीकाक्षस्य नाभीसरसि वसतु नश्चित्तहंसश्चिराय ॥२३॥
भगवान श्रीहरीच्या कमरेचे आणि त्यावरील मेखलेचे लोकविलक्षण सौंदर्य वर्णन केल्यानंतर आचार्य श्रींची प्रेम दृष्टी आणखी थोडी वर जाते. आणि त्यानंतर ती ज्या आनंद कल्लोळात डुबकी मारते ते स्थान म्हणजे भगवंताची नाभी.
त्या आनंद कुंडाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
उन्नम्रं कम्रमुच्चैरुपचितमुदभूद्यत्रपत्रैर्विचित्रैः – ज्यामधून वर आलेले, कम्र म्हणजे अत्यंत विलोभनीय, हजारो पाकळे यांनी युक्त असलेले,
पूर्वं – विश्वातील सर्व प्रथम निर्मिती असणारे,
गीर्वाणपूज्यं – सगळ्या देवतांसाठी पूजनीय असलेले,
कमलजमधुपस्यास्पदं – कमळातून जन्माला आलेले ब्रह्मदेव हेच जणू त्यातील भुंगा असलेले,
तत्पयोजम् – ते दिव्य नाभिकमळ.
तस्मिन्नीलाश्मनीलैस्तरलरुचिजलैः पूरिते – नीलमण्याप्रमाणे तेजस्वी असलेली, भगवंताच्या शरीरातून निर्माण झालेल्या निळ्याच जलाने भरलेली,
केलिबुद्ध्या
नालीकाक्षस्य नाभीसरसि वसतु नश्चित्तहंसश्चिराय – आमच्या मनरूपी हंसाला क्रीडा बुद्धी झाल्याने त्याच्यासाठी मानस सरोवर आसमा नसणाऱ्या त्या आधी सरोवरात माझे मन अखंड राहो.
हंस जसा सतत अत्यंत निर्मळ जल असणाऱ्या मानस सरोवरात क्रीडा करण्याची इच्छा करतो.तेथेच त्याचे मन रमते. तसे माझे मन या भगवंताच्या नाभी कमल रुपी सरोवरात सतत आनंदमग्न राहो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply