आदौ कल्पस्य यस्मात् प्रभवति सततं विश्वमेतद्विकल्पैः
कल्पान्ते यस्य चान्तः प्रविशति सकलं स्थावरं जंगमं च ।
अत्यन्ताचिन्त्यमूर्तेश्चिरतरमजितस्यान्तरिक्षस्वरूपे
तस्मिन्नस्माकमन्तःकरणमतिमुदा क्रीडतात् क्रोडभागे ॥२७॥
भगवान श्री विष्णूच्या उदराचे असे बाह्य स्वरूप वर्णन केल्यानंतर त्याचा वास्तविक अंतरंग स्वरूपाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत.
सकाळ विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा आधार असणाऱ्या त्या महा उदराबद्दल आचार्य श्री येथे तात्त्विक भूमिका मांडत आहेत.
ते म्हणतात,
आदौ कल्पस्य यस्मात् प्रभवति सततं विश्वमेतद्विकल्पैः – ज्याच्यातून कल्पाच्या आरंभी अर्थात ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्माण करण्याच्या काळाच्या आरंभी, हे सर्व विश्व त्यातील सर्व प्रकारच्या विकल्पांसह निर्माण होते.
अर्थात या विश्वातील प्रत्येक पदार्थ शेवटी भगवंता पासूनच प्रगट होतो.या सगळ्याचा मूळ स्रोत श्रीहरींनींचे उदरच असते.
कल्पान्ते यस्य चान्तः प्रविशति सकलं स्थावरं जंगमं च – कल्पाच्या अन ती म्हणजे प्रणय काळी हे सर्व स्थावर आणि जंगम विश्व ज्याच्या मध्ये प्रवेश करते.
अत्यन्ताचिन्त्यमूर्तेश्चिरतरमजितस्यान्तरिक्षस्वरूपे – अशा त्या अत्यंत अचिंत्य अर्थात कल्पनेच्या पार असणाऱ्या, भगवान श्री विष्णूच्या अंतरिक्ष स्वरूप म्हणजे अपार अशा,
तस्मिन्नस्माकमन्तःकरणमतिमुदा क्रीडतात् क्रोडभागे – उदर रुपी सागराच्या किनाऱ्यावर आमचे अंतकरण आनंदाने क्रीडा करीत राहो.
जोपर्यंत त्यात विलीन होत नाही तोपर्यंत त्याच्या सौंदर्याचा आनंद घेत राहो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply