संस्तीर्णं कौस्तुभांशुप्रसरकिसलयैर्मुग्धमुक्ताफलाढ्यं
श्रीवत्सोल्लासिफुल्लप्रतिनववनमालांशुराजत्भुजान्तम् ।
वक्षः श्रीवृक्षकान्तं मधुकरनिकरश्यामलं शार्ङ्गपाणॆ:
संसाराध्वश्रमार्तैरुपवनमिव यत्सेवितं तत्प्रपद्ये ॥२८॥
भगवान श्री विष्णूंच्या उदराचे नितांत मनोहर वर्णन केल्यानंतर स्वाभाविक आणखीन वर गेलेली आचार्यश्रींची दृष्टी भगवंताच्या विशाल वक्षस्थलावर रुळते. त्याचे अद्वितीय वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
संस्तीर्णं कौस्तुभांशुप्रसरकिसलयैर्मुग्धमुक्ताफलाढ्यं – भगवान श्रीहरीच्या वक्षस्थळावर समुद्रमंथनातून प्राप्त झालेला कौस्तुभ नावाचा दिव्य मणी विराजमान असतो. त्याच्या मधून निघणारे दिव्य प्रकाश किरण सर्वत्र पसरलेले आहेत. ते जणूकाही एखाद्या पुष्पातून निघालेल्या केसरा प्रमाणे सुंदर दिसत आहेत. त्यांनी भगवंताच्या गळ्यातील मोत्यांच्या माळा अधिकच आकर्षक दिसत आहेत.
श्रीवत्सोल्लासिफुल्लप्रतिनववनमालांशुराजत्भुजान्तम् – भगवंताच्या छातीवर श्रीवत्स चिन्ह शोभून दिसत आहे. ( याचे अधिक स्पष्टीकरण पुढच्या श्लोकात येईल.) नवनवीन फुलांच्या माळा धारण करणाऱ्या ते दोन भुजांच्यामधील भाग म्हणजे वक्षस्थल प्रफुल्लित वाटत आहे.
वक्षः श्रीवक्षकान्तं – देवी लक्ष्मी चे अत्यंत प्रिय असणारे ते श्रीहरींचे वक्षस्थळ , मधुकरनिकरश्यामलं – भुंग्यांच्या समुहात प्रमाणे काळे-निळे शोभत आहे
शार्ङ्गपाणॆ:
संसाराध्वश्रमार्तैरुपवनमिव यत्सेवितं तत्प्रपद्ये – संसार रुपी मार्गक्रमण करून थकलेल्या जीवांना शांत आराम करावे असे उपवन वाटणारे ते भगवान शार्ङ्पाणी यांचे वक्षस्थळ जी इच्छा कराल ती पूर्ण करणारे आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply