हारस्योरुप्रभाभिः प्रतिवनवनमालांशुभिः प्रांशुभिर्यत्
श्रीभिश्चाप्यङ्गदानां शबलितरुचिभिः निष्कभाभिश्च भाति ।
बाहुल्येनेव बद्धाञ्जलिपुटमजितस्याभियाचामहे तद्
बन्धार्तिं बाधतां नो बहु विहतिकरीं बन्धुरं बाहुमूलम् ॥३२॥
भगवंताच्या गळ्यातील वैजयंतीमाला चे वर्णन केल्यानंतर ती माला ज्या विशाल खांद्यांवर आधारलेली आहे त्या भगवंताच्या खांद्यांचे वर्णन करतांना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणतात,
हारस्योरुप्रभाभिः – मोत्यांच्या माळा मधून बाहेर पडणाऱ्या तेजाने,
प्रतिवनवनमालांशुभिः – केलेल्या ताज्या फुलांचे सौंदर्यरूपी किरणांनी, प्रांशुभिर्यत् – जे लखलखीत दिसत आहेत.
श्रीभिश्चाप्यङ्गदानां – अंगद म्हणजे बाजूबंद. त्या खांद्यावर धारण केलेल्या रत्नखचित सुवर्ण निर्मित बाजूबंदांमुळे
शबलितरुचिभिः – तेजाने झाकाळून गेलेले,
निष्कभाभिश्च भाति – निष्क म्हणजे सोन्याचे पात्र. त्याप्रमाणे लखलखीत भासणारे,
बाहुल्येनेव बद्धाञ्जलिपुटमजितस्याभियाचामहे तद् – असंख्य भक्तगण ज्या भगवंताची हात जोडून प्रार्थना करतात, ज्याच्या समोर आपल्या इच्छित गोष्टींची कामना करतात,
बन्धार्तिं बाधतां नो बहु विहतिकरीं बन्धुरं बाहुमूलम् – त्या सगळ्यांच्या सर्व दुःखांना पेलून धरणारे, भगवंताच्या हातांचे मूळ असणारे, तेथे भगवंताचे विशाल खांदे, आमच्या दुःखांना दूर करोत.
सगळ्या अनंत कोटी ब्रह्मांडांचा ज्या खांद्यावर आहे ते खांदे आमच्या दुःखाचा भार सहन करोत ही आचार्यकृत प्रार्थना किती सुंदर आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply