वक्त्रांभोजे लसन्तं मुहुरधरमणिं पक्वबिम्बाभिरामं
दृष्ट्वा दष्टुं शुकस्य स्फुटमवतरतः तुण्डदण्डायते यः ।
घॊणः शॊणीकृतात्मा श्रवणयुगलसत्कुण्डलोस्रैर्मुरारेः
प्राणाख्यस्यानिलस्य प्रसरणसरणिः प्राणदानाय नः स्यात् ॥३९॥
भगवंताच्या अत्यंत सुकुमार आणि उन्नत अशा कपोल प्रदेशांचे वर्णन केल्यानंतर, आचार्य श्रींची दृष्टी त्या दोन कपोलांच्या मध्ये असणाऱ्या, अत्यंत नयनमनोहर अशा नासिकेवर खिळते. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
वक्त्रांभोजे लसन्तं – मुखरूपी कमलावर विलसत असणारी,
मुहुरधरमणिं पक्वबिम्बाभिरामं
दृष्ट्वा दष्टुं शुकस्य स्फुटमवतरतः तुण्डदण्डायते यः – परिपक्व अशा गुंजे प्रमाणे शोभून दिसणाऱ्या अधरोष्ठावर असल्यामुळे पोपटाचा सुंदर चोची प्रमाणे आकर्षक दिसणारी,
भगवंताचे नाक अत्यंत बाकदार आहे. ती नासिका खाली असणाऱ्या लाल चुटुक अशा ओठा वर वाकलेली असल्याने जणू काही पोपटाच्या लालबुंद चोची प्रमाणे शोभून दिसत आहे ही आचार्यांची कल्पना खरोखरच रोमांचकारक आहे.
घॊणः शॊणीकृतात्मा श्रवणयुगलसत्कुण्डलोस्रैर्मुरारेः –
भगवान श्रीहरींच्या कानामध्ये धारण केलेल्या रत्नांच्या प्रकाशाने ती अधिकच उजळून दिसत आहे.
प्राणाख्यस्यानिलस्य प्रसरणसरणिः प्राणदानाय नः स्यात् – प्राण नामक वायूच्या सर्वत्र पसरण्याचे मूळ स्रोत असणारी, अर्थात तेथूनच संपूर्ण जगाला श्वासोच्छवास ऊर्जा प्राप्त होत असते अशी, भगवंताची ती दिव्य नासिका आमच्या प्राणांचे रक्षण करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply