यत्र प्रत्युप्तरत्नप्रवरपरिलसद्भूरिरोचिष्प्रतान-
स्फूर्त्या मूर्तिमुरारेर्द्युमणिशतचितव्योमवद्दुर्निरीक्ष्या ।
कुर्वत्पारेपयोधि ज्वलदकृतमहाभास्वदौर्वाग्निशंकां
शश्वन्नः शर्म दिश्यात्कलिकलुषतमःपाटनं तत्किरीटम् ॥४७॥
भगवान श्रीहरीच्या मस्तकावरील अद्वितीय अशा केसांचा विचार केल्यानंतर आचार्यश्री त्या केसांवर विराजित असणाऱ्या अतुलनीय सौंदर्यपूर्ण मुकुटाचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी योजिलेल्या उपमा देखील अतुलनीय अशाच आहेत.
आचार्य श्री म्हणतात,
यत्र प्रत्युप्तरत्नप्रवरपरिलसद्भूरिरोचिष्प्रतान- भगवंताच्या त्या मुकुटावर लावलेल्या अत्यंत तेजस्वी रत्नांची प्रभा सर्वत्र फाकलेली आहे.
स्फूर्त्या मूर्तिमुरारेर्द्युमणिशतचितव्योमवद्दुर्निरीक्ष्या – मुळात भगवंताचे अत्यंत तेजस्वी असे मुखकमल, त्या भगवान मुरारीच्या मस्तकावर असणाऱ्या शेकडो मण्यांना त्यामुळे प्राप्त होत असलेली तेज पाहता एकाच वेळी आकाशामध्ये शेकडो सूर्य चमकले तर जसे ते दृश्य पाहणे असंभव ठरते तसे हे दृश्य वाटत आहे.
कुर्वत्पारेपयोधि ज्वलदकृतमहाभास्वदौर्वाग्निशंकां – भगवंताच्या काळ्याशार केसांच्या लहरींवर चमकणारा तो सुवर्ण मंडित मुकुट जणूकाही विशाल समुद्राच्या पलीकडे ज्वाला उसळणाऱ्या वडवाग्नी प्रमाणे दिसत आहे.
समुद्राच्या पलीकडे म्हणतांना जसा त्या केसांच्या लाटांचा विचार आहे तसाच त्याची तेजस्विता तर अग्नीप्रमाणे आहे पण पलीकडच्या किनार्यावर असल्याने दाह नाही. अशी मजेदार रचना आहे
शश्वन्नः शर्म दिश्यात्कलिकलुषतमःपाटनं तत्किरीटम् – असा तो भगवंताचा किरीट आमच्या सर्व अमंगलाचे निवारण करून तुम्हाला शाश्वत मांगल्य प्रदान करो.सुप्ताकाराः सुषुप्ते भगवति विबुधैरप्यदृष्टस्वरूपा – ज्याप्रमाणे सुषुप्ति मध्ये मग्न असलेला जीवात्मा बाहेरून जाणवत नाही, मायेने आवृत्त झालेले ब्रह्म इतरांना जाणवत नाही त्याप्रमाणे भगवान झोपले असताना या केशसंभारामुळे ते देवतांना देखील दिसेनासे होतात. यामध्ये भगवान जणूकाही झाकाळले जातात.
व्याप्तव्योमान्तरालास्तरलरुचिजलारंजिताः स्पष्टभासः – त्या केसांवर धारण केलेल्या मुकुटा मध्ये लावलेल्या मण्यांची चमक पाहतांना जणूकाही विशाल आकाशात होत असलेली चांदण्यांची चमचम जाणवते. संपूर्ण काळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर लुकलुकणाऱ्या चांदण्यांच्याप्रमाणे जाणवणारी आचार्यांची प्रतिभा खरोखरच अद्वितीय आहे.
देहच्छायोद्गमाभा रिपुवपुरगुरुप्लोषरोषाग्निधूम्याः – संपूर्ण शत्रूच्या शरीररूपी ऊद-राळ यांना जाळून उठणाऱ्या धुराच्या रेषेप्रमाणे हे कुरळे केस भासतात.
आचार्य श्रींच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली आणखीही एक वेगळी उपमा. भगवंताची केस कुरळे आहेत. त्या कुरळ्या रेषा त्यांना धुरा प्रमाणे वाटतात. मात्र धूप लावल्यानंतर येणारा धूर पांढरा असतो. मात्र केस काळे आहेत. त्यासाठी आचार्य श्री हा धूप सामान्य नसून राक्षसांच्या विनाशातून उगवलेला आहे असे म्हणतात त्यात राक्षसांचा काळेपणा आहे अशी अद्वितीय भूमिका मांडत आहेत.
केशाः केशिद्विषो नो विदधतु विपुलक्लेशपाशप्रणाशम् – केशी राक्षसाला मारणाऱ्या भगवंताच्या केसां मुळे आमचे सर्व क्लेश रुपी पाश नष्ट होवोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply