मोदात्पादादिकेशस्तुतिमितिरचितां कीर्तयित्वा त्रिधाम्नः
पादाब्जद्वंद्वसेवासमयनतमतिर्मस्तकेनानमेद्यः ।
उन्मुच्यैवात्मनैनोनिचयकवचकं पञ्चतामेत्य भानोर्
बिंबान्तर्गोचरं स प्रविशति परमानन्दमात्मस्वरूपम् ॥५२॥
अशा स्वरूपात भगवान श्रीविष्णूच्या चरणकमलां पासून केसान पर्यंत वर्णन करणारेही स्तोत्र या त्रैलोक्यामध्ये जो कोणी पठन करीत या स्तोत्राचा द्वारे भगवंताचे संकीर्तन करीत त्यांच्या चरणकमलांची सेवा करेल, तो त्याच्या पापाचे कवच कितीही भयानक असले तरी त्याला भेदून, पंचत्वाचा निरास झाल्यावर अर्थात हा देह सोडल्यानंतर, सूर्याच्या आत विद्यमान असणाऱ्या म्हणजे शास्त्राने हिरण्यगर्भ रूपात वर्णन केलेल्या परमात्म स्वरूपात विलीन होऊन अविरत परमानंदाचा आस्वाद घेत राहिल.
अशा शब्दात या स्तोत्राची फलश्रुती वर्णन करून आचार्य श्री आपल्या वाणीला विश्रांती देतात.
—————————————
परमप्रिय वाचकगण !
सादर जय गजानन.
१ जानेवारी २०२० पासून आरंभ केली ही रसग्रहण यात्रा. वास्तविक वर्षाचा संकल्प होता परंतु सुरू असलेले स्तोत्र खंडित करणे अयोग्य असल्याने अशा स्वरूपात ३८१ श्लोकांचे रसग्रहण करून आज या उपक्रमाला परमपूज्य भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांच्या चरणकमली समर्पित करीत आहे.
एका क्षणात ही लेखमालिका दैनिक हिंदुस्थान मधून प्रकाशित करण्यास सहर्ष तत्परता दाखवणारे ज्येष्ठ बंधू श्री विलासजी मराठे, या उपक्रमातील गणेश स्तोत्रांचे पुस्तक यापूर्वीच प्रकाशित करणाऱ्या आणि आगामी पुस्तकांच्या प्रकाशनाच्या तयारीत असणाऱ्या ऋचा प्रकाशनाच्या आदरणीय मुळे वहिनी तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत नित्य उत्साहवर्धन करणारे आपण सर्व वाचक आपल्या सगळ्यांचे प्रेम असेच आयुष्यभर वृद्धिंगत होत राहो.
पुन्हा कधीतरी भगवत कृपेने आणखी एखादी योजना घेऊन निश्चितपणे भेटत राहूच.
तोपर्यंत, सध्या पुरता…..
जय गजानन.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply