यो विश्वप्राणभूतस्तनुरपि च हरेर्यानकेतुस्वरूपो
यं सञ्चिन्त्यैव सद्यः स्वयमुरगवधूवर्गगर्भाः पतन्ति ।
चञ्चच्चण्डोरुतुण्डत्रुटितफणिवसारक्तपङ्कांकितास्यं
वन्दे छन्दोमयं तं खगपतिममलस्वर्णवर्णं सुपर्णम् ॥६॥
भगवंताच्या आयुधाचे वर्णन केल्यानंतर भगवान विष्णूच्या सोबत स्वाभाविकच याचे अत्यंत सहजरीत्या स्मरण होते त्या भगवंत वाहन असणाऱ्या श्री गरूडांचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री नी केलेले आहे. ते म्हणतात,
यो विश्वप्राणभूतस्तनुरपि च हरेर्यानकेतुस्वरूपो – या संपूर्ण विश्वाच्या भगवान विष्णूचा शरीराला देखील धारण करणारा, त्यांच्याही स्वरूपाचा आधार असणारा, त्यांचे यान म्हणजे वाहन आणि केतू म्हणजे ध्वज असणारा.
भगवंताच्या झेंड्यावर देखील गरुडाचे चिन्ह अंकित असते. त्यामुळे भगवंताला गरुडध्वज असे म्हणतात.
यं सञ्चिन्त्यैव सद्यः स्वयमुरगवधूवर्गगर्भाः पतन्ति – ज्याचे केवळ स्मरण केल्याने देखील नाग लोकांच्या वधूंचे गर्भ तत्काळ पतन पावतात. अर्थात त्याच्या स्मरणाने शत्रू जन्मापूर्वीच नष्ट होतात.
चञ्चच्चण्डोरुतुण्डत्रुटितफणिवसारक्तपङ्कांकितास्यं – ज्याची अत्यंत तीक्ष्ण आणि प्रचंड चोच, नाग योध्यांच्या तुटलेल्या मस्तकातील वसा आणि रक्त यांनी माखलेली आहे.
वन्दे छन्दोमयं तं खगपतिममलस्वर्णवर्णं सुपर्णम् –
त्या अत्यंत शुद्ध, सोनेरी रंगाने तळपणाऱ्या शरीराच्या, छंदोमय अर्थात ज्ञानसंपन्न असणाऱ्या सर्व पक्षांचा राजा असणाऱ्या सुपर्ण नामक गरुडाला मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply