वाग्भूगौर्यादि भेदैर्विदुरिह मुनयो यां यदीयैश्च पुंसां
कारुण्यार्द्रैः कटाक्षैः सकृदपि पतितैः संपदः स्युः समग्राः ।
कुन्देन्दुस्वच्छमन्दस्मितमधुरमुखांभोरुहां सुंदराङ्गीं
वन्दे वन्द्यामशेषैरपि मुरभिदुरोमंदिरामिन्दिरां ताम् ॥८॥
प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज, श्रीवैकुंठनाथ सहचरी असणाऱ्या देवी लक्ष्मी चे गुण वैभव वर्णन करीत आहेत.
वाग्भूगौर्यादि भेदैर्विदुरिह मुनयो यां – वाणी म्हणजे सरस्वती, भू म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे गोमाता, अशा विविध भेदांनी मुनी जिला जाणतात, अर्थात देवता, सृष्टी, जीव इत्यादी सगळ्यांमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख स्त्रिलिंगात केला जातो, त्या सगळ्या रुपात हीच नटली आहे अशा रूपात मुनी जिची स्तुती करतात.
यदीयैश्च पुंसां
कारुण्यार्द्रैः कटाक्षैः सकृदपि पतितैः संपदः स्युः समग्राः – जिचा सहज कारुण्यपूर्ण कृपा कटाक्ष एकदा जरी पडला तरी माणसाला सर्व प्रकारच्या संपत्ती कायम प्राप्त होतात.
कुन्देन्दुस्वच्छमन्दस्मितमधुरमुखा- कुंद पुष्प ,चंद्र यांच्याप्रमाणे स्वच्छ आणि मंदस्मित युक्त असे जिथे मुख आहे.
अंभोरुहां सुंदराङ्गीं – सांभाळणाऱ्या तिच्या मांड्या अत्यंत सुंदर आहेत.
वन्दे वन्द्यामशेषैरपि – सगळ्या वंदनीय देवतांना देखील वंदनीय असणारी. मुरभिदुरोमंदिरामिन्दिरां ताम् – मुर राक्षसाचा शत्रू असणाऱ्या भगवान श्री विष्णूच्या हृदयरूपी मंदिरात निवास करणाऱ्या, चहा देवी इंदिरा महालक्ष्मीला मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply