या सूते सत्त्वजालं सकलमपि सदा सन्निधानेन पुंसो
धत्ते या सत्त्वयोगाच्चरमचरमिदं भूतये भूतजालम् ।
धात्रींस्थात्रीं जनित्रीं प्रकृतिमविकृतिं विश्वशक्तिं विधात्रीं
विष्णोर्विश्वात्मनस्तां विपुलगुणमयीं प्राणनाथां प्रणौमि ॥९॥
भगवान विष्णूची पत्नी रूपात जसा देवी लक्ष्मी चा गौरव केला जातो तशाच स्वरूपात भूमातेला देखील विष्णू पत्नी स्वरूपातच वंदन केले जाते. त्या भूदेवीचे वर्णन करताना, भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
या सूते सत्त्वजालं सकलमपि सदा सन्निधानेन पुंसो – झी भगवंताच्या अधिष्ठानावर सत्व जालाच्या माध्यमातून हे संपूर्ण विश्व निर्माण करते.
या विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेचा आरंभ सत्व गुणाच्या प्रगटीकरणाने होत असल्याने, पुढच्या सर्व प्रक्रियेला सत्वजाल असे म्हंटले आहे.
धत्ते या सत्त्वयोगाच्चरमचरमिदं भूतये भूतजालम् – त्या सत्वगुणाच्या आधारानेच जी या सर्व चराचर विश्वाला आणि प्राणिमात्रांना धारण करते. या सगळ्यांचा आधार होते.
धात्रीं – या सगळ्यांना धारण करणारी
स्थात्रीं – या सगळ्यांचे आधारस्थान असणारी.
जनित्रीं – सगळ्यांना निर्माण करणारी.
प्रकृतिमविकृतिं – प्रारंभिक निर्मिती आणि नंतर त्यातील सर्व बदल जिच्यामुळे होतात अशी.
विश्वशक्तिं – वैश्विक शक्ती असणारी.
विधात्रीं – मूल निर्मितीप्रक्रिया.
विष्णोर्विश्वात्मनस्तां – श्री विष्णूंचे विश्वात्मक स्वरूप असणारी.
विपुलगुणमयीं – असंख्य गुणांनी युक्त असणारी.
प्राणनाथां प्रणौमि – त्यांची प्राणप्रिय असणारी जी पृथ्वी, तिला मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply