को ह्येवान्यादात्मनि न स्यादयमेष
ह्येवानन्दः प्राणिति चापानिति चेति।
इत्यस्तित्वं वक्त्युपपत्त्या श्रुतिरेषा
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३४।।
आपल्या अंतरंगी निवास करून आपल्या सर्व इंद्रिय समूहांना संचालित करणाऱ्या या आत्मचैतन्याचे चिंतन हेच अध्यात्म शास्त्रांचे मूळ उद्दिष्ट आहे.
विविध अंगाने हा विषय मांडताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
को ह्येवान्यादात्मनि न स्यादयमेष – जर हा परमात्मा आत नसता, तर या सगळ्याला कोणी चालवली असते? असा विचार करणे आवश्यक आहे.
एखादी गाडी केव्हा चालताना दिसते तेव्हा ती स्वतः चालत नसते तर तिला आत मध्ये बसलेला चालक चालवत असतो. गाडी स्वतःहून सुरू होणे, पुढे जाणे किंवा थांबणे यापैकी कोणतीही क्रिया करू शकत नाही. चालकाच्या इच्छेने या सर्व क्रिया घडतात. त्याच स्वरूपात नेहा च्या द्वारे होणारी प्रत्येक क्रिया आत बसलेला हाच चैतन्यरूप परमात्मा संचालित करतो.
ह्येवानन्दः प्राणिति चापानिति चेति – “हाच प्राणाचा आनंद घेतो आणि अपानाचा त्याग करतो ” अशा या श्रुतीत हेच सांगितले आहे.
प्राण स्वीकारणे म्हणजे श्वास घेणे तर अपान त्यागणे याचा अर्थ वायु चा त्याग करणे.
अर्थात अशा स्वरूपात अदृश्य क्रिया देखील तोच परमात्मा चालवतो.
अदृश्य सोबतच या क्रिया अखंड चालणाऱ्या आहेत. अर्थात या शरीराचे अखंड धारण तेच चैतन्य करीत असते हेच श्रुतीने वारंवार सांगितलेले आहे. स्पष्ट करून दिलेले आहे.
इत्यस्तित्वं वक्त्युपपत्त्या श्रुतिरेषा – श्रुती मधील कथनानुसार त्याचे हेच अस्तित्व वर्णन केले आहे.
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे- त्या संसाररूपी अंधकाराचा नाश करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply