रागामुक्तं लोहयुतं हेम यथाग्नौ
योगाष्टाङ्गैरूज्ज्वलितज्ञानमयाग्नौ।
दग्धात्मानं ज्ञं परिशिष्टं च विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।४१।।
भगवंत प्राप्ती होईपर्यंत, परमानंद स्वरुपाची प्राप्ती होई पर्यंत मानवी जीवनाची वाटचाल कशा प्रकारची असावी? किंवा कोणत्या मार्गाने या पदाची प्राप्ती होते हे सांगताना प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री एक अत्यंत सुंदर उपमा दिलेली आहे.
मानवी जीवन म्हणजे जुन काही एखादा सुंदर सोन्याचा दागिना आहे अशी सुंदर उपमा देत त्या उपमेचे सौंदर्य उलगडून दाखवताना आचार्य श्री म्हणतात,
रागामुक्तं लोहयुतं हेम यथाग्नौ – लोखंडाने युक्त असणारे सोने जसे अग्नीत टाकल्यानंतर त्यातील सर्व राग म्हणजे मिसळलेले रंग, डाग, कचरा इ. सर्व निघून जाते.
केवळ शुद्ध सोने शिल्लक राहते.
योगाष्टाङ्गैरूज्ज्वलितज्ञानमयाग्नौ
दग्धात्मानं – त्याप्रमाणे अष्टांग योगाने अग्नीला प्रज्वलित करून, ज्ञानरूपी अग्नीमध्ये स्वतःला जाळून घेऊन,
आपल्या मध्ये असणाऱ्या अविद्येचा संपूर्ण नाश केल्यानंतर,
ज्ञं परिशिष्टं च विदुर्यं – शिल्लक राहिलेल्या परम अशुद्ध अशा ज्ञानस्वरूपाला जाणून घेतले जाते.
सोने मूलतः अत्यंत शुद्ध असते. मात्र त्या सोन्याचे दागिने बनवायचे असतील तर त्यात काही अंशी का होईना पण डाग मिसळवावा लागतो. असे डाग लावलेले सोने अग्नीत टाकल्यानंतर हा डाग जसा जळून जातो त्याप्रमाणे या संसारात जीवाच्या ईश्वरी चैतन्यावर साचलेला अविद्येचा मळ अष्टांग योगाने जागृत केलेल्या ज्ञानाग्नीमध्ये जळून गेल्यानंतर ज्या परमात्म स्वरूपाची प्राप्ती होते,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधकाराचा नाश करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply