पायाद्भक्तं स्वात्मनि सन्तं पुरुषं यो
भक्त्या स्तौतीत्याङ्गिरसं विष्णुरिमं माम्।
इत्यात्मानं स्वात्मनि संहृत्य सदैक
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।४३।।
प्रस्तुत स्तोत्राचा समारोप करतांना आचार्यश्रींनी पारंपरिक पद्धतीची फलश्रुती मांडलेली नाही. याच नव्हे तर कोणत्याही स्तोत्राची जी अंतिम अपेक्षा आहे, थेट तिचेच प्रतिपादन करीत आचार्य श्री स्तोत्राचे समापन करतात. त्या परमेश्वराला प्रार्थना करतात,
पायाद्भक्तं स्वात्मनि सन्तं पुरुषं यो – माझ्या अंतरंगी स्थिर असणारा तो पुरुष माझे पालन करो.
पुर म्हणजे नगर. या शरीरालाच नगर असे म्हणतात. त्यामध्ये राहणाऱ्या जीवात्म्याला पुरुष असे म्हणतात.
त्या आपल्या जात असणाऱ्या चैतन्याला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत.
भक्त्या स्तौति – भक्तीने मी त्याची स्तुती करीत आहे.
अंङ्गिरसं विष्णुरिमं माम् – तो अंगीरस भगवान विष्णू माझे पालन करो.
यातील अंगीरस शब्द मोठा सुंदर आहे. अंग शब्दाचा अर्थ अवयव. एखादा भाग. एक छोटा अंश. जीव अशा पद्धतीने परमात्म्याचा छोटा अंश आहे.
त्यामुळे जीवाला अंश तर परमात्म्याला अंशी असे म्हणतात. जीवाला अंग परमात्म्याला अंगी असे म्हणतात.
अशा स्वरूपात अंगी असलेला, अर्थात समस्त चराचर सृष्टीचा एकत्रित आधार असलेला जो रस तो अंगीरस.
तो भगवान विष्णू आहेत असे आचार्य येथे वर्णन करीत आहेत.
इत्यात्मानं स्वात्मनि संहृत्य सदैक – त्याचा अंश असलेला मी त्या अंशी मध्ये मिसळून जावा. अशा स्वरूपात सर्वांना मिसळून घेऊन जे स्वरूप तत्व विलसत असते,
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.
श्री हरि: शरणम् !
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply