आचार्येभ्यो लब्धसुसूक्ष्माच्युततत्त्वा
वैराग्येणाभ्यासबलाञ्चैव द्रढिम्ना।
भक्त्यैकाग्र्यध्यानपरा यं विदुरीशं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।५।।
आपल्या जवळ ज्ञानाचे साधन स्वरूपात असलेल्या पंचज्ञानेंद्रियांनी जरी भगवंताचा अनुभव घेता येणे शक्य नसले तरी त्यासाठी काही वेगळे मार्ग शास्त्राने दिलेले आहेत.
हे मार्ग कोणकोणते ? याचे विवेचन करताना आचार्य श्री म्हणतात,
आचार्येभ्यो – आचार्यांच्या अर्थात श्रीगुरूंच्या कडून प्राप्त झालेल्या ज्ञानानुसार,
लब्धसुसूक्ष्मात् – अत्यंत सूक्ष्म तत्वा असलेल्या,
अच्युततत्त्वा – अच्युता तत्वाला जाण्याच्या बाबतीत, साधकाला यश प्राप्त होते.
अर्थात श्रीगुरूंची प्राप्ती हा या मार्गातील पहिला टप्पा आहे. त्यांच्या मार्गदर्शनात भगवंताचे दर्शन घडू शकते.
त्यानंतर आवश्यक असणारी दुसरी गोष्ट सांगताना आचार्य श्री म्हणतात,
वैराग्येण – वैराग्य पूर्ण रीतीने अर्थात भगवंताच्या प्राप्ती शिवाय अन्य कोणत्याही विषयात आसक्ति न ठेवता,
अभ्यासबलाञ्चैव द्रढिम्ना- दृढ परिश्रमपूर्वक केलेल्या अभ्यासाने. याच शास्त्र ग्रंथांचा अभ्यास हा ज्ञानमार्ग तथा अष्टांग योग मार्गाचा विचार अपेक्षित आहे.
त्याचा दृढ निर्धारपूर्वक अभ्यास अनिवार्य आहे असेच आचार्य सांगत आहेत.
आणखी एक महत्त्वाचे साधन सांगतांना ते म्हणतात,
भक्त्यैकाग्र्यध्यानपरा – परमभक्तीने एकाग्रतापूर्वक ध्यान करून,
यं विदुरीशं – ज्या भगवंताला जाळता येते,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply