एका फार मोठ्या कंपनीचे उदघाटन आहे म्हणून जय्यत तयारी झाली होती. कंपनीचे नाव श्रेय. कंपनीच्या सर्व मजुरांना आणि सहकारी लोकांना आमंत्रित केले होते. कंपनी सुरू होऊन बरेच दिवस झाले होते पण मग आता उदघाटन कसे कोण करणार आहेत हे कळले नाही. पण सगळेच उत्साहाने काम करत होते. आणि थोड्याच वेळात मालकाची सजलेली अलिशान गाडी दारात उभी राहिली. मालक स्वतः पुढे जाऊन गाडीतून एका वृद्ध महिलेचा हात धरून सावकाश व्यासपीठावर घेऊन आले आणि त्यानंतर आले शहरातील एक तयार कपड्यांचे दुकान मालकच नव्हे तर खूप मोठा व्यवसाय होता कपडे शिवून तयार करण्याचा कारखानाच जणू. आता हे कशाला आले असतील याचा अंदाज येईना. आता दुसरा धक्का एक मोठी ट्रक भरून रेनकोट आले. तिसऱा धक्का बसला एका शाळेतील मुख्याध्यापक व काही शिक्षक आले…
उदघाटन झाले कंपनीचे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आणि कंपनीचे मालक त्या वृदध महिलेच्या पाया पडून बोलायला माईक समोर गेले. त्या बाईलाही कळेना की हे सगळे काय चाललय. माझ्या मित्रानो आता मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. पण त्या आधी…. एका छोट्या गावात एक गरीब विधवा झोपडीत रहात होती. शेतातील कामे मजुरीवर करुन जगत होती. पोट भरत होते पण मुलाच्या वाटेला असे दिवस नको म्हणून तिने शहराचा रस्ता धरला. काही दिवस पडेल ती कामे करुन एका नातेवाईकांकडे रहात होती. जून महिन्यात शाळा सुरू झाल्या. ती मुलाला घेऊन एका सरकारी शाळेत गेली मुलाचे नाव घातले. अजून वेळ होता शाळा सुरू व्हायला. त्यामुळे ती एका घरी गेली आणि मला कामाची खूप गरज आहे. त्यामुळे तुम्ही द्याल तितकेच घेऊन मी पडेल ती कामे करायला तयार आहे असे म्हणून हात जोडले. आणि तिला तिथे धुणीभांडी करायचे काम मिळाले. प्राणाणिकपणा कष्ट. स्वच्छता आणि मुख्य म्हणजे नम्रता यांनी तिला आणखीन चार घर मिळाली. आणि तो मुलगा आईला मदत करायला जायचा. तिथे एक त्याच्याच वयाचा त्यांचा मुलगा त्याचे घर. कपडे. गणवेश. पुस्तक वगैरे पाहून थक्क व्हायचा पण हट्ट केला नाही. शाळेत न जाता तो आईबरोबर आजही कामाला आला. बाईने विचारले त्याला बर वाटत नाही आई म्हणाली वशेजारच्या घरात कामाला गेली. बाई म्हणाल्या तुला थंडी वाजत आहे आणि बर वाटत नाही मग आलास का. तो म्हणाला की मी एकदम चांगला आहे पण दोन दिवस झाले पाऊस कमी होत नाही म्हणून कपडे वाळलेले नाहीत दुसरे कपडे नाहीत घालायला आणि गणवेश नाही म्हणून आई सोबत कामाला आलोय. हे अंगावर फडके गुंडाळून बाईने लगेचच मुलाचा नवीन गणवेश त्याला दिला अजून बरेच नवीन कपडे शालेय साहित्य वगैरे दिले व अभ्यास करायला रोज येत जा असेही बजावले. बाई स्वतः एका वस्तीच्या शाळेवर नोकरी करत होत्या म्हणून त्यांना जाणीव होती आणि त्यांचे मिस्टर मोठ्या हुद्द्यावर होते. अनेक वर्षे झाली. मुलगा शिकून मोठ्या कंपनीत नोकरी करत अमेरिकेत बायको मुलासह. तेव्हा त्याचे वडिल वारले होते. म्हणून एका वृद्धाश्रमात आईला ठेवून भरपूर पैसा दिला आश्रमाला. इकडे हा गरीब मुलगा अथक परिश्रम करून यशस्वी झाला. आणि आईने मुलाचे यशस्वी जीवन पाहून आंनदात समाधानात इहलोक सोडला. या मुलाने यानंतर खूप शोध घेतला असता बाईंचा शोध लागला. आणि आता त्या इथे माझ्या आईच्या जागी आहेत म्हणून आता मीच त्यांच्या कडे राहणार आहे. आता दुसरे हे सगळे रेनकोट माझ्या सहकारी मजूर बांधवांना देण्यात येतील. तिसरे म्हणजे यांच्या व बाजूला असलेल्या वस्तीवरील शाळेतील मुलांना मुलींना हे दुकान मालक गणवेश व आणखी एक ड्रेस देतील कारण पाऊस गरीबांना कसा वाटतो हे अनुभवाले आहे. या साठी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी मदत करावी अशी विनंती करतो. हे मी करु शकलो ते फक्त माझ्या या आई मुळे यांनी पंखात बळ दिले म्हणून याचे सर्व श्रेय यांच्या मुळेच. तो मुलगा म्हणजे मी व त्या बाई म्हणजे या माझ्या आईच.
माझ्या अनुभवानुसार मी सांगतो की प्रामाणिक पणा व जिद्दीने केलेला अभ्यास याला पर्याय नाही. त्यामुळे मोठय़ा शाळेत गेल्यावरच मोठं होता येत असा भ्रम मनातून काढून टाका आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून चांगले संस्कार करा. याचे श्रेय नक्कीच मिळेल. टाळ्यांचा कडकडाट आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आलेले पाणी याचा पूर पाहून बाहेरचा पाऊस लज्जीत झाला आणि थोडा वेळ थांबला. बाईनी मुलाला कुशीत घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यामुळे खऱ्या अर्थाने श्रेय साकारले..
सौ कुमुद ढवळेकर
DHANY DHANY WATALE