श्री गणेश खमेर – काम्पुचिया
खमेर येथील विघ्नहर्त्याची ही गणेश-मूर्ती १२ व्या शकतील असून आजही त्याच स्थितीत आढळून येते. या मूर्तीचा अभ्यास करताना मूर्तीकाराने इतरत्र आढळणार्या मूर्तीचा सखोल अभ्यास करून एक वैशिष्टपूर्ण मूर्ती तयार केलेली आहे.
उजवा पाय डाव्या पायावर ठेऊन आसनस्थ झालेली ही मूर्ती बुद्धा प्रमाणे वाटते. मान मात्र खांद्यात रुतल्याप्रमाणे जावा पद्धतीची वाटते. या मूर्तीच्या चेहर्यात नाविन्यता आढळते. इतर गणेशाप्रमाणे सोंड मोठी नसून फार लहान आहे व कान लहान तर सुळे मोठे असे वेगळे वैशिष्ट्य जाणवते.
या मूर्तीला परिधान केलेला मुकुट कंबोडियन राजा प्रमाणे असून अलंकाराने शुशोभित केलेला आहे. दंडात दागिने मलेशियन पद्धतीचे तर वस्त्र व त्यावरील दागिने बोर्निओ पद्धतीचे. गळ्यात व मनगटात कोणताच दागिना आढळत नाही. मूर्तीचा एक हात मान्डीवर तर दुसर्या हातात लेखणी आढळते.
या मूर्तीचे निरीक्षण केल्यानंतर आढळणारे गुढ म्हणजे डोळ्यापासून सुरु होऊन, कानाला स्पर्श करून पुन्हा सोंडेकडे वळलेला अर्ध पानाचा आकार व त्यावरील नक्षी. या गणपतीचा अभ्यास करता रोमच्या गुरु-मूर्ती गणेशाच्या कपाळावरील नक्षी म्हणजे ॐ कराचा प्रारंभ. तसेच काही कल्पनेच्याही पलीकडील गुढता ह्या नक्षीत आहे काय? हे सारे त्या विघ्नहर्त्यालाच ठाऊक. अशा प्रकारे आपणास अजून एक नाविण्यपूर्ण गणेशाचे दर्शन घडले.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply