ॐ नमस्ते गणपतये ।।
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि ।। त्वमेव केवलं कर्ता$सि।।
त्वमेव केवलं धर्ता5सि।। त्वमेव केवलं हर्ता$सि।।
त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षादात्मा5सि नित्यम् ||
हे ॐ कार स्वरुप गणाधीशा (देवादि गणांचा स्वामी असलेल्या देवा) तुला नमस्कार असो.
तूच प्रत्यक्ष ब्रह्म तत्व आहेत. तत्वमसि म्हणजे सर्व ब्रह्म (तत् -तो, त्वं-तू,असि- आहेस)
विश्वाधिगणपतीचे एक सत् तत्व आहे. एकच वस्तू येथे आहे. अनेक वस्तू नाहीतच. मानवी जीवात्मा व ब्रह्मा या दोहोंचे ऐक्य प्रतिपादलेले आहे.
एकच तत्व सर्वास प्रत्यक्ष होणारे आहे.तेच तत्व सर्वाचे पालन करीत आहे. प्रत्यक्ष होणारे, अनुभवाला येणारे, या विश्वामध्ये दुसरे तत्वच नाही. आकाराला आलेल्या सर्व नाशिवंत पदार्थात ओतप्रोत भरलेले जे सक्ष अविनाशी तत्व आहे ते गणपतीच आहे.
(दुधाचे दही होते किंवा दोन लाकडांच्या घर्षणाने अग्नी निर्माण होतो. लाकडात अग्नी आहे असे म्हटले तर दिसत नाही म्हणून अज्ञानी हसतील) हे सत्य तत्व एकच आहे.
(सत्य न बदलणारे, जग सुध्दा बदलते) हे तत्व नुसते वर्णन करुन कळणार नाही तर अनुभवनानेच कळेल.
तुकाराम महाराज म्हणतात……
नमो आदिरुपा ओमकार रुपा |
विश्वचिया रुपा गजानना ।।
तू निराकार, निर्गुण, शाश्वत आणि अनंत आहेस. तूच एकटा यः सर्व सृष्टीला निर्माण करणारा आहेस, पालन करणारा आहेस, व संहार करणारा पण आहेस.
सर्व खाल्विंद ब्रम्ह या श्रुतीने प्रतिपादिलेले सकळ, व्यापक ब्रह्म गणपती आहे. ब्रह्म हा शब्द वाढणे, मोठे होणे या अर्थी बृह धातुवरुन बनला आहे. जे बृहत्तम किंवा महत्तम आहे आणि ज्यात वाढणे या क्रियेचे सर्व अर्थ समाविष्ट आहेत ते ब्रम्ह होय. सोप्या शब्दात सांगावयाचे तर एक मूल द्रव्य किंवा मूल वस्तू ज्यातून काही व्यक्त होत असते. त्याचा देखावा दिसत असतो आणि त्याच्यातच ते लय पावते अशा अव्यक्त मूल वस्तूला ब्रम्हा असे म्हणता येईल. उपनिषदांत ब्रह्म शब्दाचा भावार्थ असा आहे. ० ) विश्वात्मक, शाश्वत, स्वयंभू, विश्वशक्ती २) संपूर्ण व स्वतंत्र असे अध्यात्मिक प्रेरक तत्व ३) व आनंदाचे चेतन व स्वयंपूर्ण आगर, ब्रह्म हे बुघिगम्य आहे. अनुमानाने व तर्काने समजता येईल. परंतु मनाने ब्रह्माचे चिंतन करता येत नाही. कारण तिचे मनच लय पावते. तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरुप आहेस, ब्रह्म व आत्मा हे शब्द एकाच अर्थाने योजलेले आहेत व त्यामुळे तत्व या शब्दाचे स्पष्टीकरण केलेले आहे.
श्री गजाननपुत्र
विद्याधर ठाणेकर
Leave a Reply