नवीन लेखन...

श्री कृष्णा नदी माहात्म्य

कृष्णा नदी ही साक्षात् विष्णुस्वरूप व वेणी ही शिवस्वरूप असून या दोन्ही नद्या एकरूपाने अभिन्नपणे वाहतात म्हणूनच कृष्णा नदीला केवळ कृष्णा हे नाव नसून तिला कृष्णावेणी असे संबोधतात.

अशा या दोन नद्या व शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती मिळून पंचगंगा असे सात नद्यांचे मिलन श्रीनरसिंहवाडी या क्षेत्री झाले आहे. आसमंतात श्रीदत्तगुरुंचा संचार झालेने त्यांच्या रजःकणांनी ही भूमी अत्यंत पवित्रतम झालेली आहे. श्री दत्तमहाराजांचे हे अत्यंत आवडते स्थान आहे. पवित्र अशा या कृष्णा तटाकावर देवर्षी, राजर्षी, महान्, तपस्वी साधू आणि धर्मनिष्ठ लोक मोठ्या आनंदाने व सुखाने राहतात. त्यांनी आपले पुण्यश्रमही या तीरावर कायम राहण्यासाठी थाटले आहेत. त्यामुळे श्रीनरसिंहवाडी क्षेत्र हे भूवैकुंठ म्हणून गणले गेले आहे.

या कृष्णातीरावर शुक्लतीर्थ, पापविनाशी, काम्य, सिद्ध,अमर, कोटी, शक्ती व प्रयागतीर्थ अशी अष्टतीर्थे असून, ती पवित्र व रमणीय आहेत. ही तीर्थे सर्व महापातके, कायिक, वाचिक व मानसिक पापांचे निर्दालन करणारी आहेत. केवळ दर्शनमात्रे सर्व पातकांचा नाश होतो तर प्रत्यक्ष स्नान व तीर्थ जलपान घडले असता सर्व पातकांचा नाश होईल याबाबत काय संशय ! यामुळे या क्षेत्रास अपूर्व असे पावित्र्य प्राप्त झाले ‘आहे.

या क्षेत्रात वास घडावा असे मोठेमोठे ज्ञानी, भक्तजन इच्छा करतात. येथे मिळणारा आनंद परमेश्वराच्या तादात्म्यात मिळणाऱ्या आनंदापेक्षाही अधिक वाटतो. या तीर्थराजांच्या दर्शनाने तात्काळ सर्व जीवांची पातके नष्ट होतात. शिवाय आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक त्रितापही जळून नष्ट होतात व चित्तवृत्ती शांत होते. राजाधिराज श्रीदत्तमहाराजांची चिरकाल वास करण्याची ही पुण्यभूमी आहे व राजधानी आहे.

श्रीदत्ताची राजधानी । पाडूनी धन्य होती जीवनी ॥
चारी पुरुषार्थ लाभुनी । अन्ती जाती स्वर्गासी ।

राजा ज्याप्रमाणे आपल्या राजधानीत सिंहासनावर बसून प्रजाजनांची गाऱ्हाणी ऐकतो व दुःखे दूर करतो, तद्वत् श्रीदत्तमहाराज या राजधानीत सिंहासनावर विराजमान होऊन भूतप्रेत-पिशाच्चादि सर्व पीडा, संसारिक यातना दूर करतात व आपल्या भक्तजनांना सुखमय करतात. म्हणून हे स्थान श्रीदत्ताचे जागृतस्थान म्हणून गणले आहे.

अशा या परमपावन रमणीय सप्तनद्यांच्या संगमाने पवित्र झालेल्या संगमस्थानावर श्रीदत्तप्रभूंचा द्वितीय अवतार भगवान नरसिंहसरस्वती महाराजांनी बारा वर्षे वास्तव्य करुन आपल्या तपश्चर्येने ही भूमी पवित्र केली व भक्त लोकांच्या मनकामना पूर्ण होण्याकरिता आपल्या ‘मनोहर पादुका’ या ठिकाणी स्थापन केल्या की ज्यांच्या दर्शनाने आजही सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात.

श्रीक्षेत्र नरसिंहवाडी येथे गेल्या सव्वाशे वर्षांपूर्वीपासून श्रीकृष्णावेणीचा उत्सव माघ महिन्यात होत असतो. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पुराण याविषयाकरिता कृष्णामहात्म्य सांगत असत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..