दिनांक ३ मे २०१३च्या दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री प्रभाकर देवधर, बांद्र यांचा ‘अणुउर्जा प्रकल्पांना माझ्या विरोधाची महत्वाची कारणे” संबंधित पत्र वाचण्यात आले ते विषयाला धरून उत्तम व अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद आणि अभिनंदन..!!
पत्रात आपण आपले परखड आणि प्रांजळ विचार मांडून सरकारचे कुठे चुकते, कसा भ्रष्टाचार होतो, कसे चुकीचे निर्णय घेतले जातात,
अणुउर्जेपेक्षा सौर उर्जा कशी स्वत आहे, सौर उर्जेचा वापर केल्याने वीज कशी स्वत मिळू शकते, निसर्गाचा पर्यायाने वातावरणातील तापमानाचा आणि पर्यावरणाचे रक्षण कसे चांगल्या रीतीने करता येते, विजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती याचे विश्लेषण खुपच चांगल्या रीतीने केले आहे. आणि मुख्य म्हणजे अणुउर्जेवर देशांनी कितीही खर्च केला आणि जलद गतीने काम केले तरी देशाच्या जरुरीच्या २ ते ३ टक्केसुद्धा उर्जा २०३० सालापर्यंत अणुउर्जा निर्माण करणार नाही हे नक्की याबद्दल असलेला ठाम विश्वास आणि चीड याबद्दल आपले स्वत:चे मत मांडून वाचकांच्या (नागरिकांच्या) मनातील विचारांना वाट करून दिल्याबद्दल प्रथम श्री प्रभाकर देवधर यांचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन.
पत्र वाचून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. अश्याही गोष्टी सरकारात चालतात ह्या गोष्टी जनता ऐकून होती पण आपल्या ८० च्या शतकातील दिल्लीवासी असणे तसेच प्रत्यक्ष अनुभवाने आणि अभ्यासाने सांगितलेल्या सरकारच्या भूलथापा आपण नजरेआड करू शकत नाही असे आपल्या एकंदरीत संपूर्ण लेख वाचल्यावर लक्षात येते. अणुउर्जा, सौर उर्जा आणि इतर उर्जेपेक्षा किती महाग पडते तसेच त्याचे भविष्यातील धोके आणि पर्यावरणाचे संकट यांची सांगोपांग चर्चा आणि माहितीमुळे देशातील जनतेचा अणुऊर्जे बद्दलचा समज-गैरसमज दूर होण्यास चांगले मार्गदर्शन झाले.
दैनिक प्रत्यक्षच्या ‘चालता बोलता इतिहास’ यासदरात
ून महाराष्ट्रातील मराठी उद्योजक श्री.प्रभाकर देवधरांच्या मुलाखतीने सर्व वाचकांना ओळख झालीच होती त्यात आज या लेखाने श्री प्रभाकर देवधर यांची एका वेगळ्या विषयातील अभ्यासक म्हणून पुनर्भेट झाली. दैनिक प्रत्यक्षचे आभार आणि आपल्या स्तुत्य उपक्रमा बद्दल धन्यवाद.
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply