नवीन लेखन...

।। श्री शंख जन्म कथा ।।

देव्हाऱ्यातील देव अनेक    शंख तयांमध्ये एक
महत्त्व त्याचे जाणोनी ठीक     सकलजन हो ।। १।।

हिंदूची दैवते अनेक     रूपे देवांची कित्येक
इष्ट देवता पूजितो प्रत्येक     सर्व देवांमध्ये ।।२।।

देव्हाऱ्यातील देवांत    शंखघंटा असावी त्यांत
प्रथा पूजेची असण्यात    हिंदूच्या ।।३।।

शंखास पूजेतील मान    प्राप्त होई ‘वर’ मिळोन
कथा त्याची जाणून    घ्यावी तुम्ही ।। ४।।

सांदिपनी ऋषीच्या आश्रम     शिष्यगण करिती श्रम
प्रफुल्लता आनंद नी प्रेम    आश्रममध्ये ।। ५।।

कृष्ण गोपा संगती     विद्या अभ्यास घेती
संदिपनीचे आश्रमी राहती    सर्व शिष्य गण ।। ६।।

ईश्वर होई शिष्य जेथे    काय उणे मग तेथे
सीमा नसे आनंदाते     ऋषीच्या आश्रमी ।। ७।।

निसर्ग नयन मनोहर     पुष्पलता यांचे माहेर
तृप्त होती घेता फलाहार    आश्रमवासी ।। ८।।

श्रीकृष्णाचा सहवास    लाभता त्या आश्रमास
वाव नसे दु:खास     त्या वातावरणी ।। ९ ।।

परि तेथील एक व्यक्ती     दु:खी कष्टी होती
रात्रंदिनी झोप न येती    गुरु पत्नीला ।। १० ।।

सांदिपनी गुरुपत्नी     आश्रू होते तिचे नयनी
स्वपुत्र गमावूनी     सागरामध्ये ।। ११।।

कृष्ण विनविता गुरूसी     स्वीकारण्या गुरू दक्षिणेसी
सोडण्यापूर्वी आश्रमासी    ज्ञान संपादूनी ।।१२।।

शिष्य म्हणूनी राहीला     सार्थक दिले जीवनाला
हेच फळ गुरू दक्षिणेला    मिळत असे तूजमुळे ।। १३ ।।

सांदिपनीचे सारे समाधान     कृष्ण जैसा शिष्य गण
गुरू दक्षिणा मागील कोण    प्रभू कडूनी ।। १४ ।।

गुरूपत्नी संसारिक     आंतरमनी इच्छा एक
गुरू दक्षिणेचा मागती हक्क    कृष्णाकडून ।।१५ ।।

बाळ बुडाला सागरी     असह्य माझे जीवन करी
कशी जगू त्याचे परी    बाळाविना ।। १६।।

असता इच्छाशक्ती    घेवूनी यावे बाळाती
परत द्यावे माझे हाती     हीच आसे गुरूदक्षिणा ।।१७ ।।

गुरूपत्नीस वंदिले    कृष्ण सागरतिरी आले
सागरासी आव्हान केले     गुरुपुत्रासासाठी ।। १८।।

प्रगट झाली सागर देवता     कृष्णासी वंदन करिता
सांगू लागली लीन होता     प्रभू समोरी ।। १९।।

शंखासूर नामे राक्षस     सागरतळी करी वास
सागरी जिवांना देता त्रास     राजा बनूनी तयांचा ।। २० ।।

गुरुपुत्र पडता सागरी     शंखासूर गिळंकृत करी
बाळ तयाचे उदरी     जात आसे ।। २१।।

सागरी राजा शंखासूर     असूनी तो आसूर
भक्ती तयाची हरीवर     विष्णूसी पूजित आसे ।। २२।।

रावणाचे जैसे शिव दैवत     तैसा शंखासूर विष्णू भक्त
भाव प्रभू चरणी अर्पित    मनोभावे ।।२३।।

शंखासूरास दर्शन दिले    श्रीकृष्ण प्रकट झाले
प्रभू आसूनो विनविले     शंखासुरासी ।।२४।।

गुरूबाळ तुझे उदरी     तो मजलागी परत करी
इच्छा केली श्री हरी     शंखासूरासी ।। २५ ।।

झाला शंखासूर धन्य     घेवूनी प्रभूचे दर्शन
आनंदाने भरले मन     प्रभूसी बघोनी ।। २६ ।।

फाडोनीया उदरासी    काढावे बाळासी
विनविले प्रभूसी     शंखासूराने ।। २७ ।।

बघूनी त्याचे आत्मापर्ण    बाळ देण्या पोट फाडून
श्रीकृष्ण होई प्रसन्न     त्याचे वरी ।। २८।।

प्रसन्न होई भक्ती बघोनी     आशीर्वाद दिला प्रभूनी
घ्यावा ‘वर’ मागोनी     श्रीकृष्ण बोले ।। २९।।

पूजेमध्ये मान मिळावा    देवामाजी गणला जावा
सदैव प्रभू सहवास घडावा     ही माझी इच्छा ।। ३०।।

‘तथास्तू’ म्हटले प्रभूनी    त्याच्या भक्तीस बघूनी
‘वर’ दिला हरीनी     शंखासुरास ।। ३१ ।।

आत्मार्पण करूनी    स्वत:चे उदर फाडूनी
बाळास परत देवूनी    टाकले आसे ।। ३२।।

बलीदानाचे प्रतीक     रूप मिळेल तव शंख
जल पडता होईल अभिषेक    तुझ्या पोटातूनी ।। ३३ ।।

तुझ्या उदरातून जलधार    पडत राहील देवांचे वर
सार्थक पूजा न होई तोवर    तूजविण पूजेमध्ये ।। ३४ ।।

शंखाविना पूजा निरर्थक     पूजेमध्ये असेल तो एक
मिळण्या पूजेचे सार्थक    शंख घंटा आसावी ।। ३५ ।।

शंखासी धरले हाती     प्रभूचा सहवास लाभती
मोठेपण तयासी मिळती      अपूर्व भक्तीमुळे ।।३६।।

शंखासूराचा शंख बनला     देवाऱ्यात मान मिळाला
सर्व देवामध्ये बसला     भक्ती सामर्थ्याने ।।३७।।

भक्तीचा महीमा थोर    अंतरयामी आसावा ईश्वर
देवत्व येते असूनी असूर     कुणालाही ।।३८।।

कुणीही नसती थोर लहान     मिळवावे लागते मोठेपण
जेव्हां होई प्रभूचरणी लीन     देवत्व तयांना येई ।। ३९।।

जीवनाचे तत्त्वज्ञान     थोर बनूनी व्हावे लीन
सकलजनांचा मिळेल मान     हेच माझे सांगणे ।। ४० ।।

“ शुभं भवतू “

 

डॉ. भगवान नागापूरकर
९- २९१०८३

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..