विठ्ठलाचा गजर होई
गाता-मनातून
विठ्ठलाचे रुप दिसे
माझ्या माय-बापातून
पायावर डोई ठेवी
राहो जन्मभरी संग
कधी वाचली ती पोथी
कधी गायला अभंग
पुंडलिका भेटी उभा
युगे-युगे राहिशी
तुकारामासाठी म्हणे
विमान धाडिशी
सर्व शांती देई
नको चित्त सवंग
माझ्या डोळ्यांचे पारणे
कधी फिटे पांडुरंग
नव्हे कंदी पूजा
नाही कधी वारी
ना कौतुके साठी
मी वारकरी
डोळ्यांतून वाहे
तूझ्या भक्तीचा झरा
सोडीव सोडीव आता
नको जन्म फेरा
– सौरभ दिघे