नवीन लेखन...

बंदिशकार पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर

बंदिशकार पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर यांचा जन्म २७ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. पं. हळदणकर यांनी संगीतविषयक संशोधन आणि लेखनही केले होते. आग्रा घराण्याचे गायक आणि बंदिशकार म्हणून पंडित बबनराव हळदणकर यांची ओळख होती. मा.हळदणकरानी ५० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. रस पिया हे त्यांचे टोपणनाव होते. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करत असत. हळदणकरांनी सुरुवातीला मोगूबाई कुर्डीकरांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी खादिम हुसेन खाँसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली. त्यांनी आग्रा घराण्याची डौल आणि लयकारी स्वीकारली. १९५९ पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले. १९६०च्या दशकापासून हळदणकरांनी आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली.

आग्रा घराण्यातील गायकांची ध्रुपद धमाराशी बांधिलकी असते तसेच नोमतोम आलापाने ते राग मांडतात. हळदणकर आपल्या दरबारी, मियाँकी तोडी, मलुहा केदार वगैरे रागांतील चीजांमधून नोमातोम आलाप मांडत असत. बबनराव हळदणकर हे एखाद्या चांगल्या तबलजीच्या साथीत लयकारीचे अनेकरंगी आविष्कार ऐकवत असत. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवतात आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडत असत.

हळदणकर आग्रा घराण्याचे भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे ख्यात होते. आग्रा घराणे हे ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्यास बरीच प्रसिद्धी होती. त्यानंतरही आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती महाराष्ट्रातील हळदणकर बंगालमधील विजय किचलू यांनी मांडली. हळदणकरांनी गोवा कला अकादमी, खैरागढचे संगीत विद्यापीठ तसेच अन्यत्रही संगीताचे अध्यापन केले.. रागांच्या प्रमाणीकरणावरही त्यांनी काम केले. पं. हळदणकर यांचा खूप मोठा शिष्यपरिवार आहे. अरुण कशाळकर, वृंदा मुंडकूर, देवकी पंडित, डॉ. राम देशपांडे, विश्वजीत बोरवणकर हे हळदणकरांचे शिष्य आहेत. भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘हृदयेश संगीतसेवा’ पुरस्कार, कलकत्त्याच्या आय.टी.सी संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार असे पं. बबनराव हळदणकर यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.

पं. बबनराव हळदणकर यांचे १८ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.

बंदिशकार पं. बबनराव हळदणकर यांचे ग्रंथलेखन
जुळू पहाणारे दोन तंबोरे

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..