श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून १५० मैलावर असणार्या काटरगाव सुब्रमण्यम मंदिरात श्री गणेशचे दर्शन घडते. या मंदिरात श्री गणेशाचे स्वतंत्र स्थान असून गजाननाचे पूजन अर्चन वैदिक पद्धतीने केले जाते.
या मंदिरावर सार्वजनीक अधिकार बौद्धांचाच चालतो. दक्षिण भारतातून या गणेशाचे आगमन श्रीलंका येथे झाले असले पाहिजे कारण मूर्तीच्या मुकुटाचा आकार बालाजी येथील मंदिरातील मूर्तीच्या मुकुटाच्या आकारानुसार आढळतो. परंतू गळ्यातील यज्ञोपवीत मात्र सर्पाचे नसून साधे आहे. गळ्यात व हातात दागिनेही आढळतात. अश्या प्रकारे दक्षिण भारताशी साम्य व फरक असलेल्या गजाननाचे दर्शन “श्रीलंकेत” घडते. पोलोनारुआ या शिवमंदिरात असलेला हा गणेश अतिप्राचीन व मूळ स्वरुपात आहे. इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्याही पूर्वी श्री गणेश स्वरुपात “श्रीलंका” येथे आढळते. मूर्ती एकदंत असून डाव्या हातात मोदक वरच्या दोन्ही हातात आयुधे आढळतात. ही आयुधे अस्पष्ट दिसतात. मूर्तीच्या इतर बाजूस सेवकगण आढळतात. मूर्तीच्या आसनावर तीन चित्रे कोरलेली दिसतात. त्यापैकी मधल्या चित्रात अग्निकुंड, बाजूला पूजा करणारा पुजारी व शेवटी उंदीर दाखविले आहेत. परंतू याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हे दैवत जागृत मानले जाते. देवाच्या गाभाऱ्यात पूजा करणार्या महंताशिवाय कुणालाच प्रवेश नसतो. देऊळ बंदिस्त असून दिवसाही दिवे लावूनच पूजा करावी लागते. मंदिर नदीकाठी असून त्या नदीला माणीकगंगा असे म्हणतात. नदी स्नानंतरच मंदिर प्रवेशास मुभा आहे. हा गणेश वरद असून त्याच्या कृपाप्रसादाचे अनुभव अनेकांना आल्याच्या अनेक कथा आहेत. येथे श्री गणेशाची काकड आरती, शेजारती हा प्रकार न होता पहाटे श्री गणेशाची पूजाच केली जाते. हा प्रकार नाविण्यपूर्ण वाटतो. दुपारी अकरा वाजता व सायंकाळी सात वाजताही देवाचे पूजन केले जाते. अश्या प्रकारे पहाटे, दुपारी व संध्याकाळी श्रींचे पूजन होते. योगायोग विंदा हे महागणपती स्तोत्र केवळ हिंदूच नव्हे तर बोद्ध, ख्रिती, मुसलमान व इतर धर्माचेही लोकं वाचतात आणि म्हणूनच श्रींचा कृपाप्रसाद व्हावा असे आवाहन करतात. गणेशाला अभिषेकही घातला जातो. अभिषेक कुणीही घालू शकतो. अश्या प्रकारे भरतीय संस्कृतीचा पडसाद प्रतिबिंबित “श्रीलंका” येथील श्री गणेश दर्शन घडते.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply