पुण्यातील इंटरनेट रेडीओ ‘श्रीपाद रेडीओ’ चे मालक व रेडीओचे संग्राहक श्रीपाद कुलकर्णी यांचा जन्म २० डिसेंबर १९५७ रोजी झाला.
श्रीपाद कुलकर्णी हे स्वत: परवानाधारक हॅम रेडिओ ऑपरेटर आहेत. श्रीपाद कुलकर्णी हे राज्य विद्युत मंडळातील निवृत्त इलेक्ट्रिकल अभियंता आहेत. श्रीपाद कुलकर्णी १९७८ साला पासून रेडिओचे संग्रह करत आहेत. श्रीपाद कुलकर्णी यांनी १९७८ साली चिपळूण येथे नोकरीला असताना एका स्थानिक स्टोअरमधून विकत घेतलेला फिलिप्स रेडिओ सेट हा त्यांचा पहिला सेट. श्रीपाद कुलकर्णी यांच्या कडे ४० हून अधिक vintage रेडिओ सेट्स आहेत. त्यांनी देशात आणि विदेशातील आपल्या अनेक दौऱ्याच्या मध्ये हे रेडिओ मिळवले आहेत. नॅशनल पॅनासोनिक, सोनी, फिलिप्स, बुश, ग्रुंडिग आणि टेक्सन सारख्या अनेक ब्रँड्सचे रेडिओ त्यांच्या कडे आहेत.
कात्रज येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये कामाच्या टेबलावर अनेक रेडिओ वापरात आहेत. त्यांच्याकडे २०१३ मध्ये ते कॅनडामध्ये असताना १७०००/ रुपये देऊन खरेदी केलेला Sangean हा त्यांचा आवडता रेडिओ आहे. यात नेहमीच्या एएम, एफएम, एसडब्ल्यू आणि एलडब्ल्यू बँड शिवाय हॅम रेडिओ बँडचा समावेश आहे.
श्रीपाद कुलकर्णी यांचे स्वतःचे श्रीपाद रेडिओ या नावाचे आपले स्वतःचे राऊड-द-क्लॉ क (२४ तास चालू असलेले) इंटरनेट रेडिओ स्टेशन आहे. तिथे ते बॉलिवूड गाण्यांचे, दिन विशेष वरील संगीताचे कार्यक्रम आणि भक्ती संगीताचे कार्यक्रम चालू असतात.
गेले चार वर्षाहून अधिक जगभरातील १००० हून अधिक लोक श्रीपाद रेडिओ कायम ऐकत असतात.
श्रीपाद कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply