सिद्धार्थ जाधव हा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा विनोदी अभिनेता. त्याचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबई येथे झाला. सिद्धार्थ जाधवने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकामधून प्रकाशझोतात आला. ‘हुप्प हुय्या’ मधील ‘हणम्या’, ‘दे धक्का’ मधील ‘धनाजी’, ‘लालबाग परळ’ मधला ‘स्पीडब्रेकर’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ मधला ‘उस्मान पारकर’ आणि अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले आहे. मराठी चित्रपटांबरोबरच सिद्धार्थने काही हिंदी चित्रपटात सुद्धा काम केलंय. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमातही काम केले आहे. रंगभूमी, मालिका, चित्रपट अशा तिनही माध्यमात सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply