सोलापूरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हे मंदिर प्रसिद्ध आहे.दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.श्री सिध्दरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतिक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रसह कर्नाटक,आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पांढरे वस्त्र परीधन केलेले असतात, यास बाराबंदी असे म्हटले जाते.
१२ जानेवारीला सिध्दरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तेलाभिशेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते. १४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा संपन्न केला जातो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते. १६ जानेवारी रोजी रात्री मालीकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.
सिध्दरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते.एके दिवशी कुंभार कन्येने सिध्दरामेश्वर यांना तिचा मानस सांगीतला कि ती सिध्दरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते, सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले कि मी ब्रम्हचारी आहे , माझे विवाह महादेवाशी झाले आहे.तरीही ती कुंभार कन्या ऐकली नाही,त्यावर सिद्धरामेश्वर तिला बोले की तू या माझ्या योगदांडा सोबत विवाह कर पण तुला विवाहाच्या दुसऱ्या दिवशी तुझा देह त्याग करावा लागेल.१३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्याने तिचा देह त्याग केला.
यंदा करोना मुळे सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वज मिरवणूक रद्द करण्यात आली असून यात्राकाळात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply