दिग्वीजयाच्या स्वारीवरती, निघे सिकंदर सैन्य घेवूनी
जग जिंकण्या ध्येय मनाशीं, महान आशा उरी बाळगूनी
आश्वा रुढ ते सैनिक सारे, सिकंदराच्या मागें धावती
लगाम खेचूनी वृक्षा पाशीं, एक साधू तो बघूनी थांवती
पृच्छां करितां साधू म्हणाला, शांत चित्त तो बसला असे
मिळविण्यास ते कांहीं नसतां, शोध प्रभूचा घेत दिसे
सिकंदर वदे देश जिंकूनी, संपत्ती घेई लुटून सारी
जगत् जेता नांव कमवूनी, जाईन माझ्या देश दरबारी,
काय करशील नंतर तू गे? प्रश्न विचारी तो साधू जन
“शांत राहण्या प्रयत्न करित, अखेरचा मी काळ घालविन”
मिस्कीलतेने साधू विचारी, मी तर आजच शांत आहे
धडपड सारी करूनी एवढी, माझ्याच मार्गे तुम्ही जाए
ध्येय विसरूनी सारे आपण, धावत असतो वेड्या परी
प्रभू मिलनाचे कार्य खरे, ते मनास जागविते केंव्हां तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply