सायमन कमिशन आयोगाचे अध्यक्ष जॉन सायमन यांचा जन्म दि. २८ फेब्रुवारी १८७३ रोजी मँचेस्टर येथे झाला.
सायमन कमिशन या आयोगाचे ते अध्यक्ष होते. सायमन कमिशन हे १९२८ साली ब्रिटिश भारताच्या वसाहतींत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसद सदस्यांचा इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन होता.जॉन सायमन यांच्या नावावरून सायमन कमिशन हे नाव पडले या आयोगाची निर्मीती १९१९ या कायद्याप्रमाणे झाली,या कायद्यानुसार दर दहा वर्षांनी रॉयल कमिशनच्या नेमणुकीची तरतुद होती.१९१९ च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांना नवीन योजना जाहीर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली.या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आयोगाविरोधातील निदर्शनांपैकी लाहोरातील एका निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले व त्यातून त्यांचा मृत्यू झाला.जॉन सायमन यांचे ११ जानेवारी १९५४ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply