अपर्णा संत यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण श्री बैरागी बुवा, प्रभाकर जोशी. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९७० रोजी झाला. श्रीमती वसुमती भागवत यांच्याकडे कोरेगाव आणि सातारा येथे झाले. श्रीमद् भगवद् गीतेतील तील तत्त्वज्ञान सांगणाऱ्या पंचवीस हिंदी व पंचवीस मराठी गाण्यांना अपर्णा संत यांनी चाली दिल्या आहेत. सध्या हा कार्यक्रम अपर्णा संत व आर्या आंबेकर सादर करत असतात. सुप्रसिद्ध दिग्दर्शक पंडित श्रीनिवास खळ्यांनी अपर्णा संत यांच्यासाठी जनाबाईचे अभंगाना चाली दिल्या आणि २००७ साली ‘अभंग जनाईचे’ ही अपर्णा संत यांची सी.डी यांच्या श्रीनिवास खळे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली प्रसिद्ध झाली आहे. अपर्णा संत यांनी संगीत क्षेत्रातील नामवंत ज्योत्स्ना भोळे गजानन वाटवे, अरुण दाते, सुरेश वाडकर, रवींद्र साठे श्रीधर फडके, सलील कुलकर्णी, स्वप्निल बांदोडकर यांच्या बरोबर कार्यक्रम केले आहेत.
अपर्णा संत या भावसंगीत व चित्रपट संगीतावरील सांगीतिक विश्लेषणात्मक कार्यक्रम सादर करतात. संगीतकार मदन मोहन किंवा इतर अनेक संगीतकारांवरचे संगीतकारांच्या विविध सांगीतिक परिभाषेतील बद्दलचे कार्यक्रम त्या त्यांच्या विद्यार्थिनींना घेऊन कार्यक्रम सादर करत असतात.
‘गुरुवंदन’, ‘मधुबोली’, ‘इंडेमाऊ ची गाणी’ (बालगीते), ‘ही बहिण बहिणाबाईची’ हे अल्बम अपर्णा संत यांनी संगीत बद्ध केले आहेत. या अल्बम्स मध्ये सुरेश वाडकर, रवींद्र साठे, स्वप्निल बांदोडकर. आर्या आंबेकर. प्रियांका बर्वे प्रांजली बर्वे यांनी आवाज दिलेला आहे. तसेच शांताबाई शेळके यांच्या कवितांवर कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम अपर्णा संत यांनी बसवलेले आहेत.
‘गाणं मनातलं’ हा स्वतः संगीत दिलेल्या वचनांचा रंगमंचीय आविष्कार त्या सादर करतात. ‘मल्हार अकॅडमी ऑफ म्युझिक” ही त्यांची स्वतःची संस्था असून या संस्थेद्वारे अपर्णा संत सुगम संगीत व ओंकार साधना प्रशिक्षण वर्ग १९९९ सालापासून घेत आहेत. अपर्णा संत यांना गाण्यासाठी उषा अत्रे पुरस्कार व रोटरी क्लब कडून पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा आगामी प्रोजेक्ट म्हणजे सुधीर मोघे यांच्या कवितांचा रंगमंचीय अविष्कार सादर करणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply