गायक उस्ताद बडे गुलामअली खान यांचा जन्म २ एप्रिल १९०२ रोजी झाला.
लाहोर येथे जन्मलेले बडे गुलाम अली खान फाळणीनंतर तेथेच राहिले. पहिले काही वर्ष ६ महिने भारत आणि ६ महिने पाकिस्तानात येथे राहत. त्यांनी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना भारताचे नागरिकत्व मिळण्याकरता मदतीची विनंती केली. आणि खासाहेब हिंदुस्थानचे नागरिक झाले. मैफलीत खांसाहेबाना अपेक्षित ठेका तबलजीकडून मिळाला नाही कि फक्त ठुमऱ्या गाऊन वेळ मारून नेत. कै जी एन जोशी एक आठवण जरूर सांगतात एकदा खांसाहेब त्यांच्या घरी आंब्यांच्या दिवसात दुपारी आले होते तेव्हा साहजिकच भोजनास आमरस पुरीचा बेत होता. खासाहेब तब्येतीत जेवले जेवण संपल्यावर आमरस एवढा आवडला कि नंतर त्यांनी चार वाट्या रस प्यायले. आणि नंतर गायचा मूड लागला तेव्हा तंबोरे लावून २-३ तास तब्येतीत गायले.
ख्यालगायकी प्रमाणे ठुमरी म्हणण्यात त्यांचा हातखंड होता. मारवा आणि पुरिया सारखे जवळचे स्वर असलेले राग ऐका पाठोपाठ गात नाहीत कारण राग जरी जवळचे असले तरी दोन वेगळे राग वेगळे वातावरण निर्मिती करतात त्यामुळे ऐका पाठोपाठ शक्यतो गाऊ नयेत असे जाणकार सांगतात!! पण खांसाहेबांचे गायकीवरचे प्रभुत्व उच्च दर्जाचे होते!! १९४४ साली मुंबईत प्रथम झालेल्या मैफलीत मारवा आणि पुरिया ऐका पाठोपाठ म्हणून खासाहेबांनी रसिकांची तसेच जाणकारांची वाह व मिळवली होती. मैफलीत त्याकाळी पाच हजार रुपये खासाहेब घ्यायचे. जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गाणे म्हणण्यासाठी जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा खासाहेबांनां गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन मागितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले. जेव्हा ध्वनीमुद्रण सुरु होते तेव्हा त्यांनी ऐक आक्रमक तान घेतली आणि नौशाद म्हणाले या गाण्यात आक्रमक तान नको आहे पण त्यांना काही सुचत नव्हते तेव्हा ते म्हणाले मला केलेले चित्रीकरण दाखवा!! चित्रीकरण बघताना जवळ बसलेल्या उस्ताद निझामुद्दीन खान (तबलजी) यांना म्हणाले ये लौंडीया (अभिनेत्री मधुबाला) तो बहोत खुबसुरत है!! लतादीदी या त्यांच्या ऐक मोठ्या चाहत्या होत्या.
बडे गुलाम अली खान यांचे २३ एप्रिल १९६८ रोजी निधन झाले.
https://www.youtube.com/watch?v=Gy75Hipt8IQ
https://www.youtube.com/watch?v=BViraiWfRqU
https://www.youtube.com/watch?v=JXxe9dU9N0U
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply