बेन किंग्जले हे मूळत: भारतीय वंशाचेच आहेत आणि त्याचं मूळ नाव कृष्णा भानजी. त्यांचा जन्म ३१ डिसेंबर १९४३ रोजी झाला. ते मूळचे गुजरातीच. त्याचे वडील गुजराती होते. किंग्जले यांच्या वडीलाचां जन्म केनियात झाला.त्यांचे आजोबा व्यापारी म्हणून जांजीबार स्थायिक झाले. किंग्सले यांचा जन्म जांजीबारचा ते वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या वडीलाच्या बरोबर इंग्लण्डला गेले. बेन किंग्जले हे गांधी चित्रपटात इतके गांधींच्या भूमिकेत फिट्ट बसले, की आजही हॉलिवुडमध्ये आणि भारतात ‘गांधी’मधील त्या भूमिकेसाठीच ते ओळखले जातात. बेन किंग्जले यांना आपल्या सुरुवातीच्या काळात ‘गांधी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्या मुळे त्यांनी अभिनयाचे शिखर लवकरच सर केलं.
बेन किंग्जले यांनी साकारलेल्या गांधी या भूमिकेत सर्वाधिक लक्षात राहिले ते डोळे. त्यांनी निर्धार, करुणा, संताप, दु:ख आणि बरीचशी मिश्किली अशा विविध मुद्रा बेननं सहजपणे दाखवल्या. दांडी यात्रेत तरातरा चालणारे ‘सुपरफिट’ गांधीजी, उपोषणांमुळे थकलेले तरीही न खचलेले गांधीजी, त्यांचे भक्तगण बनलेल्या अनेक गोऱ्या मंडळींच्या फिरक्या घेणारे गांधीजी, कस्तुरबांच्या निधनामुळे प्रचंड व्यथित झालेले गांधीजी, फाळणीच्या अपरिहार्यतेपुढे अगतिक झालेले गांधीजी अशा कितीतरी छटा. अॅयटनबरो आणि किंग्जले यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणावी तर त्यांनी भारताचे राष्ट्रपिता नवीन पिढीसमोर पुन्हा जिवंत केले. बेन किंग्जले यांनी शटर आयलंड, आयर्न मॅन, प्रिंस ऑफ पर्शिया अश्या हॉलीवूड मधील चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच जंगलबुक मध्ये मोगलीचा मित्र बगिराला याचा आवाज त्यांनी दिला आहे, त्यांनी बॉलीवूड मधील ‘तीन पत्ती’ ‘ताज’ या चित्रपटात काम केले आहे.
बेन किंग्जले यांना अकादमी पुरस्कार, बाफ्टा, गोल्डन ग्लोब पुरस्कार व स्क्रीन एक्टर्स गिल्ड अवार्ड्स असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गांधी चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=XyWRx_2MFbk
Leave a Reply