सर आयझॅक पिटमॅन यांचा जन्म ४ जानेवारी १८१३ रोजी ट्रॉब्रिज इंग्लंड येथे झाला.
आयझॅक पिटमॅन यांच्या लघु लिपी (shorthand)च्या शोधा मुळे कार्यालयीन कामात आमूलाग्र बदल झाले, कार्यालय प्रमुखाला आपल्या डोक्यातील कल्पना त्यामुळे त्वरित कागदावर उतरविण्याचे साधन मिळाले, अठराव्या शतकाच्या मध्याला सर आयझॅक पिटमन यांनी विकसित केलेली इंग्रजी लघुलेखन कला अलीकडे झपाट्याने वाढ होत असलेल्या संगणक युगामुळे हळूहळू लोप पावताना दिसत असली, तरी सुमारे पाच दशकांपूर्वी इंग्रजी लघुलेखन व जोडीला टंकलेखन शिकणे हा कित्येक मध्यमवर्गीयांचा झटपट नोकरी मिळवण्याचा सर्वांत स्वस्त व परवडणारा पर्याय होता. व अभ्यास करत शैक्षणिक प्रगतीही कित्येक लघुलेखकांनी साध्य केली.
एवढेच नव्हे, तर सरकारी व खासगी क्षेत्रात लघुलेखक अशी सुरवात करून उच्चपदापर्यंत गेलेल्या व्यक्तींची उदाहरणेही खूप दिली जातात हे सर्व सर आयझॅक पिटमॅन यांच्या लघु लिपीमुळे शक्य झाले. १९८६ मध्ये त्यांचे पुस्तकाच्या १० लाखावर प्रति विकल्या गेल्या होत्या. जगातील शिक्षणशास्त्रात ते नामवंत प्रकाशक म्हणून प्रसिद्ध झाले होते.
सर आयझॅक पिटमॅन यांचे २२ जानेवारी १८९७ साली निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply