नवीन लेखन...

सर सलामत तो पगडी पचास

हल्ली कुठलीही गोष्ट घेऊन चारचौघे जमून त्यावर चर्चा किंवा टीका करत असताना आपण पाहतो. त्या गोष्टींवर बोलणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नावाखाली व्यक्त होणे असे म्हणत ते महानुभव लोक स्वतःचीे भाकरी भाजवून घ्यायचा प्रयत्न करत असतात. त्या भाजलेल्या भाकरीतून त्यांचे स्वतःचे किंवा दुसऱ्यांचे किती पोट भरते ते त्यांनाच माहित. हा झाला एक मुद्दा. दुसरा म्हणजे आपण भारतीय जोपर्यंत सरकार एखाद्या गोष्टीची ‘सक्ती’ करत नाही तोपर्यंत त्यामध्ये आपण ‘आसक्ती’ दाखवतच नाही. एकदा का सक्ती केली की नकळतपणे आपल्यामध्ये ‘आसक्तीची पालवी’ फुटते आणि त्या गोष्टीची नाईलाजाने का होईना अमलबजावणीला सुरुवात होते. उदाहरणार्थ प्लास्टिक. प्लास्टिक बंदीचा कायदा जाहिर केल्यावरसुद्धा खूप ठिकाणी चोरून प्लास्टिकचा वापर व्हायचा. मग सरकाराने स्थानिक पातळीवर एक स्वतंत्र पथक नेमून प्लास्टिक वापरणाऱ्यास ५००० रुपये दंडाची घोषणा केली. तेव्हापासून त्याचा वापर भरपूर प्रमाणात कमी झालेला दिसतो. ‘स्वछ भारत सर्वेक्षण अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेला कचरा व्यवस्थापन हे याचेच (सक्तीचे) अजून एक उत्तम उदाहरण आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाला जागोजागी, गल्लोगल्ली रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरा पेट्या काढून टाकाव्या लागल्या . तेव्हा जाऊन कुठे आम्हाला बुद्धी आली कि कचरा घंटा गाडीतच टाकावा आणि आपला परिसर आणि राष्ट्र स्वछ व सुंदर बनवावे. तेही ‘सहकार्य’ या भावनेने.

मागील काही महिन्यांपासून ‘हेल्मेट’ हा चर्चेचा विषय बनलाय. याचे काहींनी स्वागत केले तर काहींनी टीकाही. काही संस्थांनी तर थेट न्यायालयात हेल्मेट सक्तीच्या विरोधात याचिका दाखल केले. पण शेवटी न्यायालयाने त्याचे अंतिम निर्णय देत हेल्मेट वापराची सक्ती केली आणि नागरिकांना हेल्मेट वापरण्यासाठी आव्हान करण्यात आले. हेल्मेट नसेल तर ५०० रु दंड आणि योग्य ती कारवाई करण्याची सूचना देण्यात आली. सामान्य माणूस ५००रु दंड आणि कायद्याच्या भानगडीतून स्वतःला वाचविण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर विक्रीस असलेले कमी दर्जेचे फक्त ३००रु मध्ये उपलब्ध असलेले, हलक्या प्लास्टिकने बनविलेले हेल्मेट खरेदीकडे वळत आहे. अशा दर्जाहीन हेल्मेटच्या वापरामुळे मृत्यू ओढावतो परंतु मृत्यू टाळला जात नाही. काही रुपयांसाठी जीव धोक्यात घालण्यात काहीही अर्थ नाही. हजारो वर्षापासून माणूस शत्रूंच्या हल्लेपासून आपले शिररक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साधने वापरात आलेला आहे. आता काळ बदललाय परंतु धोके मात्र तितकेच गंभीर आहेत. आजकाल रस्त्यांवर येणे आणि प्रवास करणे म्हणजे युद्धभूमीवर युद्ध केल्यासारखेच आहे. इथे स्वतःला वाचविण्याचा योग्य उपाय म्हणजे ‘हेल्मेट’. वर म्हटल्याप्रमाणे टीका करणारे भरपूर आहेत. फेसबुकवर याच विषयाला घेऊन एका मित्राने म्हणे ‘दंड घेण्याऐवजी त्याच दंडाच्या रकमेतून त्या व्यक्तीला हेल्मेट घेऊन दिला तर ‘प्रबोधन’ होईल आणि नागरिक हेल्मेट वापरू लागतील. या मूर्ख राजकारणी लोकांमुळे सामान्य माणूस नेहमीच त्रास सहन करतो’. या वक्तव्यास माझं म्हणणे एवढंच आहे कि, राजकारणींचे डावपेज काय असतील या विषयात मला शिरायचं नाही पण आपल्याच हितासाठी सरकाराने दंड न घेता त्या रकमेतून हेल्मेट घेऊन देऊन ‘प्रबोधन’ करावे असे बोलणे हे काय योग्य वाटत नाही. हे असं झालं लहान बाळाला आई जेवू घालते. ते बाळ स्वतःसाठी खात असत तरीसुद्धा आईला बळजबरीने खाऊ घालावी लागते. असच काही सरकाराच्या बाबतीत घडत आहे.

हेल्मेट वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे यात सामान्य नागरिकांच्या जीवनाचे धोक्याचे प्रमाण कमी होते. पण त्यासाठी सरकारानेच ‘प्रबोधन’ करायला पाहिजे असे म्हणणे हि मोठी शोकांतिका आहे. पुणेसारख्या शहरांमध्ये धर्माच्या नावाखाली हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविण्यात आले. त्यांना एवढंच म्हणावे लागेल, “सर सलामत तो पगडी पचास”. मी स्वतः एक चांगल्या दर्जेचे हेल्मेट विकत घेऊन त्याचा रोज न चुकता वापर करून आसपासच्या नागरिकांसाठी एक उत्तम आदर्श निर्माण करू नये? शेवटी माणूस अनुकरण करणारा प्राणी आहे. एकाचे बघून दहा, दहाचे बघून शंभर आणि शंभराचे कधी हजार होतील हे कळणारदेखील नाही. बदल हि मंदगतीने होणारी गोष्ट आहे. आपण नकारात्मक दृष्टीने सगळ्या गोष्टींकडे न पाहता त्याची चांगली बाजू निरखून त्याच्या अंमलबजावणीसाठी एक पाऊल उचलणे गरजेचे आहे. चांगल्या सवयी लागण्यासाठी वेळ लागतो पण एकदा लागलेली चांगली सवय वयक्तिक बदल घडवून आणतेच आणि आजूबाजूच्या परिसरातसुद्धा आमूलाग्र बदलास कारणीभूत ठरते. ‘नियम हे तोडण्यासाठीच असतात’ अशी कुचकट कल्पना डोक्यातून काढून टाकून नियमांचे योग्य पालन करणे आपले आद्य कर्तव्य आहे. ‘मी सुरक्षित तर माझं राष्ट्र सुरक्षित’ अशी भावना मनात ठेवून एक पाऊल सुरक्षिततेकडे टाकूया.

हेल्मेट वापरला तर आपल्या सर्वांचे भलं होणार आहे नाही तर अपघातामध्ये,

“मला न माहित कोण यवन तो,
कोण जाणते मृत्यू काय तो,
हासतहासत मिठी मरणाला,
हाच अमुचा संसार”,
म्हणत मृत्यूला आमंत्रण द्यावं लागेल यात वादच नाही.

— कमलाकर रुगे
मो. नं. 7385814175

Avatar
About कमलाकर रुगे 6 Articles
मी सध्या इंग्रजी प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. आतापर्यंत माझे लेख दिव्य मराठी मध्ये प्रकाशित झालेले आहेत. मी ब्लॉग वर माझे लेख प्रकाशित करीत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..